शहरं
Join us  
Trending Stories
1
आदित्य ठाकरेंच्या नावाचा आग्रह केला पण...; विरोधी पक्षनेते पदावर भास्कर जाधव काय म्हणाले?
2
उद्धव ठाकरे यांनी आदित्य ठाकरे आणि सुनील प्रभूंवर सोपवली मोठी जबाबदारी, या पदांवर केली नियुक्ती 
3
पुन्हा पक्षफुटीची भीती? उद्धव ठाकरेंची खास रणनीती, नव्या २० आमदारांना शपथबद्ध करणार!
4
"अजित पवार यांना मुख्यमंत्री, तर मला मंत्री करा’’, राष्ट्रवादीच्या आमदाराने व्यक्त केली इच्छा
5
थोरातांच्या पराभवानंतर सत्यजित तांबे अजित पवारांच्या भेटीला; म्हणाले, "त्यांच्यासारखा माणूस..."
6
"बिहार खड्ड्यात गेलाय’’, पोटनिवडणुकीतील पराभवानंतर प्रशांत किशोर यांची प्रतिक्रिया 
7
IND vs AUS :आम्ही दबावात होतो; पण... बुमराहनं शेअर कमबॅक मागची स्टोरी
8
विदर्भातील 'या' १२ आमदारांना मतदारांनी नाकारले; महायुतीच्या आमदारांनाही दिला झटका 
9
पेन्शनधारकांनो, नो टेन्शन; हयातीचा दाखला मिळणार घरपोच!
10
IPL Auction 2025: "थोडे जास्तच पैसे गेले, आम्ही रिषभ पंतसाठी..."; LSGच्या मालकांनी सांगितला 'फसलेला' प्लॅन
11
Gold Silver Price Today : सोन्या-चांदीच्या दरात मोठी घसरण; पटापट चेक करा दिल्ली ते कोलकात्यापर्यंतचे दर
12
"कुटुंबात 4 जण, मतं मिळाली फक्त 2", 'तो' व्हिडीओ शेअर करत अभिनेत्यानं EVM वर घेतला संशय
13
लाडक्या बहिणींना पहिला हप्ता कधी येणार? १५०० की २१०० रुपये...; दिवाळी बोनस मिळणार की नाही...
14
मला फक्त विधानपरिषद नको, गृह किंवा अर्थखातं हवं; लक्ष्मण हाकेंची महायुतीकडे मागणी
15
Video: उच्चशिक्षित इंजिनीअर, प्रेयसीच्या विरहात बनला भिकारी; अवस्था पाहून लोकंही हळहळले
16
Maharashtra Vidhan Sabha Elecation 2024: नाना पटोलेंवर प्रफुल्ल पटेल वरचढ!
17
Arvind Kejriwal : अरविंद केजरीवालांची खेळी, वृद्धांसाठी मोठी घोषणा, दरमहा मिळणार 'इतकी' पेन्शन!
18
उर्वशी रौतेलाने सांगितलं अद्याप अविवाहित असल्याचं कारण; म्हणाली, "माझ्या जन्म पत्रिकेत..."
19
मुख्यमंत्र्यांच्या विरोधात निवडणूक लढविली, तोच उमेदवार शिंदे गटात जाणार; लता शिंदेंच्या उपस्थितीत घोषणा
20
भारतात ईव्हीएम हवे की, बंद व्हावे? बघा सर्व्हे काय सांगतो?

शिष्यवृत्ती परीक्षेसाठी ३० मार्चपर्यंत अर्ज करण्याची मुदत

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: March 23, 2021 4:15 AM

नाशिक : महाराष्ट्र राज्य परीक्षा परिषदेकडून घेण्यात येणारी प्राथमिक शिष्यवृत्ती परीक्षा (पाचवी) व पूर्व माध्यमिक शिष्यवृत्ती परीक्षा (आठवी) कोरोनाच्या ...

नाशिक : महाराष्ट्र राज्य परीक्षा परिषदेकडून घेण्यात येणारी प्राथमिक शिष्यवृत्ती परीक्षा (पाचवी) व पूर्व माध्यमिक शिष्यवृत्ती परीक्षा (आठवी) कोरोनाच्या संकटामुळे दोन महिने पुढे ढकलण्यात आली असून या वर्षी २५ एप्रिलला ही परीक्षा घेतली जाणार आहे. या परीक्षेला प्रविष्ट होऊ इच्छिणाऱ्या विद्यार्थ्यांना परीक्षा अर्ज सादर करण्यासोबतच शुल्क भरण्यासाठी ९ ते २१ मार्चपर्यंत मुदत देण्यात आली होती. मात्र ही मुदत संपुष्टात आल्याने शाळांना शाळा माहिती प्रपत्र व ऑनलाइन अर्ज भरण्याकरता ३० मार्चपर्यंत मुदतवाढ देण्यात आली आहे.

शिष्यवृत्ती परीक्षेसाठी पात्र विद्यार्थ्यांचे अर्ज शाळांनी ऑनलाइन पद्धतीने सादर करण्याच्या सूचना महाराष्ट्र राज्य परीक्षा परिषदेकडून करण्यात आल्या असून संकेतस्थळावर याविषयी अधिक माहिती उपलब्ध आहे. राज्यातील सर्व जिल्ह्यांमध्ये ही परीक्षा यंदा २५ एप्रिलला एकाच वेळी घेतली जाणार असून या परीक्षेसाठी अद्याप ज्या विद्यार्थ्यांचे अर्ज सादर करण्यात आलेले नाहीत, त्यांचे अर्ज ३० मार्चपर्यंत ऑनलाइन पद्धतीने सादर करण्याच्या सूचना देण्यात आल्या आहेत. शासनमान्य शासकीय, अनुदानित, विनाअनुदानित, कायम विनाअनुदानित, स्वयंअर्थसाहाय्यित शाळांमध्ये शिक्षण घेणाऱ्या विद्यार्थ्यांना या परीक्षेला प्रविष्ट होता येणार आहे. कोरोनाचे सावट अद्याप कमी झाले नसल्याने ही परीक्षा एप्रिल महिन्यात घेण्याचे निश्चित करण्यात आले आहे. गतवर्षी कोरोनाच्या पार्श्वभूमीवर घेण्यात आलेल्या परीक्षांचा निकाल जाहीर होण्यासही विलंब झाला होता. मागील वर्षी नाशिक जिल्ह्यातील ५७ हजार ६२६ विद्यार्थ्यांनी या परीक्षेसाठी नोंदणी केली होती. त्यापैकी ५४ हजार ८१६ विद्यार्थ्यांनी ही परीक्षा दिली. त्यातील १ हजार ६४१ विद्यार्थी शिष्यवृत्तीसाठी पात्र ठरले होते.