नाशिक : मुदत संपणाºया ग्रामपंंचायतीची माहिती देण्यात कसूर केल्याच्या कारणावरून त्र्यंबकेश्वरचे नायब तहसीलदार व कारकुनाला थेट निलंबित करण्याची बाब महसूल कर्मचाºयांच्या जिव्हारी लागली असून, यापूर्वीही मालेगाव, नाशिक, निफाड तालुक्यातील काही ग्रामपंचायतींच्या सदस्यांची मुदत संपुष्टात येऊनही त्यांनी अवैधपणे ग्रामपंचायतीचे कामकाज केल्याचे उघडकीस आलेले असताना त्यावेळी दोषींविरुद्ध नरमाईचे धोरण स्वीकारणाºया जिल्हा प्रशासनाच्या भूमिकेविषयी शंका घेतली जात आहे. दरम्यान, ज्यांना दोेषी ठरवून निलंबित करण्यात आले त्याच नायब तहसीलदार, कारकुनाने ग्रामपंचायतीच्या मुदतीचा घोळ जिल्हा प्रशासन व निवडणूक आयोगाच्या निदर्शनास आणून दिल्याचेही आता स्पष्ट झाले आहे.त्र्यंबकेश्वर तालुक्यातील होलदारनगर या ग्रामपंचायतीची मुदत जुलैमध्ये संपुष्टात येत असताना त्याबाबत आयोगाला माहिती देण्यात कुचराई केल्याच्या कारणावरून जिल्हाधिकाºयांनी त्र्यंबकेश्वरचे नायब तहसीलदार कनोजे व कारकून देशमुख या दोघांना तडकाफडकी निलंबित केल्याने महसूल कर्मचाºयांमध्ये अस्वस्थता व्यक्त केली जात आहे. ज्या कारणावरून त्यांना निलंबित करण्यात आले, ती बाब कनोजे यांनीच जिल्हा प्रशासन व निवडणूक आयोगाच्या निदर्शनास आणून दिली हे विशेष आहे. परंतु तरीही त्यांना कोणतीही नोटीस न देता निलंबित करण्यात आले. यापूर्वीही नाशिक तालुक्यातील पिंपळगाव गरुडेश्वर व सामनगाव या दोन ग्रामपंचायतींचा पाच वर्षांचा कार्यकाळ संपुष्टात येऊनही त्यांच्या मुदतीत निवडणूक घेण्यास कुचराई केल्याचा प्रकार नाशिक तहसील कार्यालयाकडून घडला होता. विशेष म्हणजे नाशिक पंचायत समितीच्या गटविकास अधिकाºयांनी त्याबाबतची माहिती तहसील कार्यालयाला देऊनही त्याकडे दुर्लक्ष करण्यात आले होते. परंतु या प्रकरणात फक्त तहसीलदारांची वेतनवाढ रोखण्याची कार्यवाही जिल्हाधिकाºयांनी केली होती, तर मालेगाव तालुक्यातील एका ग्रामपंचायतीच्या बाबतदेखील असाच प्रकार घडल्याने त्याबाबत तहसीलदार, गटविकास अधिकाºयाची वेतनवाढ रोखण्यावरच समाधान मानण्यात आले होेते. निफाड तालुक्यातील शिंगवे ग्रामपंचायतीच्या बाबतीतदेखील प्रशासनाचा हलगर्जीपणा उघडकीस आला असताना त्यावेळी नरमाईची भूमिका घेणाºया प्रशासनाने त्र्यंबकेश्वरच्या कसुरीबद्दल दाखविलेली तत्परता आश्चर्यजनक असल्याचे कर्मचाºयांचे म्हणणे आहे.आयोगाकडून जिल्हाधिकाºयांवर ताशेरेनाशिक जिल्ह्यात मुदत संपुष्टात येणाºया ग्रामपंचायतींची माहिती संकलित करून ती निवडणुकीसाठी निवडणूक आयोगाकडे पाठविण्यात ग्रामीण विकास व महसूल खात्याकडून होणाºया वारंवारच्या चुकांमुळे आयोगाने नाशिकच्या जिल्हाधिकाºयांवर ताशेरे ओढल्याचे बोलले जात असून, त्यामुळेच त्र्यंबकेश्वरचे प्रकरण अधिक गांभीर्याने घेऊन थेट निलंबनाची कारवाई करण्यात आली आहे.
मुदत संपणाऱ्या ग्रामपंचायतींचा घोळ नित्याचाच
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: June 27, 2018 12:07 AM
नाशिक : मुदत संपणाºया ग्रामपंंचायतीची माहिती देण्यात कसूर केल्याच्या कारणावरून त्र्यंबकेश्वरचे नायब तहसीलदार व कारकुनाला थेट निलंबित करण्याची बाब महसूल कर्मचाºयांच्या जिव्हारी लागली असून, यापूर्वीही मालेगाव, नाशिक, निफाड तालुक्यातील काही ग्रामपंचायतींच्या सदस्यांची मुदत संपुष्टात येऊनही त्यांनी अवैधपणे ग्रामपंचायतीचे कामकाज केल्याचे उघडकीस आलेले असताना त्यावेळी दोषींविरुद्ध नरमाईचे धोरण स्वीकारणाºया जिल्हा प्रशासनाच्या भूमिकेविषयी शंका घेतली जात आहे. दरम्यान, ज्यांना दोेषी ठरवून निलंबित करण्यात आले त्याच नायब तहसीलदार, कारकुनाने ग्रामपंचायतीच्या मुदतीचा घोळ जिल्हा प्रशासन व निवडणूक आयोगाच्या निदर्शनास आणून दिल्याचेही आता स्पष्ट झाले आहे.
ठळक मुद्देकारवाईत मात्र भेदभाव महसूल कर्मचाºयांमध्ये अस्वस्थता