शहरं
Join us  
Trending Stories
1
Maharashtra Election: मविआच्या 22 उमेदवारांची अनामत रक्कम जप्त, सर्वाधिक काँग्रेसचे; भाजपचा एकही नाही!
2
“सुप्रीम कोर्टाने काय करावे, हे आता एक पक्ष सांगणार का?”; चंद्रचूड यांनी ठाकरे गटाला फटकारले
3
चिन्मय दास यांच्या अटकेवरून बांगलादेशात हाहाकार! पोलिसांनी डागले 'ग्रेनेड', लाठीचार्जही केला; एकाचा मृत्यू
4
'मी नेहमी संविधानाच्या मर्यादेचा आदर केला...', संविधान दिनानिमित्त पंतप्रधान मोदींचे भाष्य
5
“अशा निवडणुका पाकिस्तान, अफगाणिस्तानात होत नसतील, आयोग जिवंत आहे का”; संजय राऊत संतापले
6
मनोज जरांगेंचे ठरले; सरकार स्थापन झाल्यावर तारीख जाहीर करणार, पुन्हा बेमुदत उपोषणाला बसणार
7
जगातील सर्वात वृद्ध व्यक्तीचे वयाच्या 112 व्या वर्षी निधन; काही दिवसांपूर्वीच दीर्घायुष्यासंदर्भात केलं होतं भाष्य
8
पाकिस्तानात तख्तापालट होण्याचे संकेत? इम्रान खान यांच्या समर्थकांसोबत सैन्य; हस्तांदोलन, मिठ्या मारल्या 
9
"दहशतवादी संघटनांना चोख प्रत्युत्तर देणार"; २६/११च्या हल्ल्याच्या वर्षपूर्तीनिमित्त पंतप्रधान मोदींचे आश्वासन
10
झुनझुनवाला यांनी 10 मिनिटांत कमावले ₹105 कोटी; 'या' दोन शेअर्समुळे लागली लॉटरी; पडला पैशांचा पाऊस!
11
"अजित पवारांनी सरेंडर होऊन आमची..."; रामदास कदमांचे मोठं विधान, म्हणाले, "काहीही केलं तरी..."
12
नाना पटोलेंनी दिल्ली गाठली, मल्लिकार्जून खरगे-राहुल गांधींची भेट घेतली; नेमके काय घडले?
13
BLOG: अमित ठाकरे निवडणुकीच्या चक्रव्यूहात शिरले खरे, पण...; 'राजपुत्रा'चं नेमकं काय चुकलं? सहा प्रमुख मुद्दे
14
...म्हणून मुख्यमंत्रिपदाचा उमेदवार जाहीर करण्यास विलंब; भाजपचे 'या' कामाला प्राधान्य
15
आधारवाडीतील इमारतीच्या पंधराव्या मजल्यावर भीषण आग; अग्निशमन दलाचे वाहन बिघडले
16
राहुल गांधींचे नागरिकत्व रद्द होणार का? केंद्र सरकार १९ डिसेंबरला उच्च न्यायालयाला निर्णय कळविणार
17
Numerology: ‘या’ ६ मूलांक होतील मालामाल, धनलाभाचे योग; नोव्हेंबरची सांगता होईल खास!
18
"हिंदूंच्या हक्कांसंदर्भात बोलणारे निर्लज्ज, ...या सरकारला भारतातील अल्पसंख्यकांची चिंता नाही"; काय म्हणाले ओवेसी?
19
तिसऱ्या महायुद्धात अण्वस्त्रांचा वापर, एक तृतीयांश लोकसंख्या मारली जाणार; सिडनीच्या बिशपची भविष्यवाणी 
20
"हे फक्त शब्द नाहीत, इशारा आहे"; चिमुकलीवरील अत्याचाराच्या घटनेनंतर अमित ठाकरे संतापले

जुन्या नोटा जमाची आज अखेरची मुदत

By admin | Published: December 30, 2016 12:06 AM

नोटाबंदीनंतर संमिश्र स्थिती : एटीएमसमोरील रांगांमध्ये नागरिकांची घट

नाशिक : सरकारने जुन्या एक हजार व पाचशे रुपयांच्या नोटांवर बंदी घातल्यानंतर अनेकांनी ५०० व एक हजार रुपयांच्या नोटांचा बँकेत भरणा करून आपल्या आयुष्यातील कष्टांची कमाई सुरक्षित केली आहे, परंतु काही अपरिहार्य कारणांनी बँकेत चलनातून रद्द झालेल्या नोटांचा भरणा करू न शकलेल्या नागरिकांसाठी शुक्रवारी (दि.३०) अखेरची मुदत असून, शनिवार, (दि. ३१ डिसेंबर) ते ३१ मार्च २०१७ पर्यंत केवळ रिझर्व्ह बँकेने निर्देशित केलेल्या केंद्रांवर अशा नोटांचा भरणा करता येणार आहे. आरबीआयने निर्देशित केलेल्या केंद्रांवर जुन्या नोटांचा भरणा करता येणार असला तरी त्यापूर्वीच बँकेत या नोटांचा भरणा केल्यास नागरिकांना पुन्हा रांगेत उभे राहण्याच्या त्रासापासून मुक्तता मिळू शकणार आहे. सध्या शहरातील विविध बँकांमध्ये संमिश्र चित्र दिसत असून, काही बँका ग्राहकांना रिझर्व्ह बँके च्या सूचनांनुसार पैसे देत आहेत, तर काहींमध्ये भरणा होत असल्याने ग्राहकांना गरजेपुरते पैसे मिळत आहे. शहरातील पैसे मिळणाऱ्या एटीएमची संख्याही गेल्या काही दिवसांच्या तुलनेत वाढली आहे. सुटे पैसे मिळण्याची समस्या कायम असली तरी काही एटीएममध्ये १०० आणि ५००च्या नोटा मिळत आहेत. (प्रतिनिधी)आॅनलाइन व्यवहारबँकांमध्ये विविध प्रकारच्या खातेधारकांकडून काही प्रमाणात का होईना पैशांचा भरणा वाढला आहे, तर अनेकांनी रोख रकमेला पर्याय म्हणून आॅनलाइन व्यवहारांना प्राधान्य देण्यास सुरुवात केली आहे, परंतु अशिक्षित नागरिकांची गैरसोय कायम असून, त्यांच्यासमोर बँकेत रांगेत उभे राहण्याशिवाय अन्य पर्याय नसल्याने काही बँकांमध्ये गर्दी दिसत आहे. त्यामुळे नोटाबंदीच्या निर्णयानंतर शहरात संमिश्र स्थिती असल्याचे चित्र आहे. शिथिल होण्याची मागणीशहरातील विविध बँकांच्या एटीएममध्ये पैसे मिळत असले तरी हे प्रमाण सर्वत्र सारखेच नसल्याने ग्राहकांना अडचणींचा सामना करावा लागतो आहे. नोटाटंचाईच्या काळात परिस्थितीत सुधारणा होत असताना प्रशासनाने शहरातील सर्व एटीएम सुरू करून पैसे काढण्याच्या अटींमध्ये शिथिलता आणण्याची गरज व्यक्त होत आहे. बँकांमध्ये तासन्तास रांगेत उभे राहूनही अपेक्षित रक्कम मिळत नसल्याने नागरिक कॅशलेस पर्याय निवडत आहेत. त्यासाठी अशा व्यवहारांची माहिती असलेल्या व्यक्तींकडून अनेकजण कॅशलेस व्यवहार कसे करायचे ते माहीत करून घेत आहेत. आॅनलाइनसह अन्य कॅशलेस व्यवहारांमध्ये तांत्रिक अडचणी येत असल्या तरी आवश्यक व्यवहार रोख रकमेऐवजी रखडण्याचे प्रमाणही हळूहळू कमी होत आहे.