नाशिक : महापालिकेच्या आॅटोडीसीआरमधील सर्व प्रलंबित प्रकरणे निकाली काढण्यासाठी आता बुधवारीपर्यंत (दि.१६) अखेरची मुदत देण्यात आली आहे.आॅटोडीसीआरमधील समस्यांच्या पार्श्वभूमीवर आयुक्त राधाकृष्ण गमे यांनी यासंदर्भात गुरुवारी (दि.१०) पाठपुरावा बैठक घेतली. यावेळी सॉफ्टवेअरमध्ये काय सुधारणा झाल्या आहेत किंवा यापूर्वीच्या कोणत्या सूचनांचे पालन झाले. याबाबत चर्चा करण्यात आली. यापूर्वीची सर्व प्रलंबित प्रकरणे बुधवारच्या आत निकाली काढण्याच्या सूचना आयुक्तांनी दिल्या आहेत. यापूर्वी ३१ डिसेंबरपर्यंतची या कंपनीला डेडलाइन देण्यात आली होती. याशिवाय सॉफ्टवेअरमध्ये शॉर्टफॉलची तरतूद करण्यात आल्याची माहिती यावेळी देण्यात आली. आॅटोडीसीआरमध्ये प्रकरणे दाखल केल्यानंतर त्यात एक त्रुटी सापडली तरी प्रस्ताव नाकारला जातो. त्या पार्श्वभूमीवर महापालिकेने त्यात त्रुटी दूर करण्यासाठी किमान काही दिवसांचा अवधी द्यावा, अशी मागणी केली होती. तशी सोय झाल्यास प्रत्येक वेळी एका चुकीसाठी प्रकरण नामंजूर होणे आणि पुन्हा दाखल करताना त्याची स्क्रुटीनी फी भरण्याचे प्रकारदेखील बंद होणार आहेत. याशिवाय सॉफ्टवेअर कंपनीने नियमानुसार दोन कर्मचाऱ्यांची नियुक्तीदेखील केली आहे. महापालिकेच्या वतीने आॅटोडीसीआर मधील दोष दुरुस्तीला प्रारंभ करण्यात आल्याने वास्तुविशारदांनी देखील समाधान व्यक्त केले आहे.
आॅटोडीसीआरला बुधवारपर्यंत डेडलाइन
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: January 11, 2019 1:14 AM