घोटी : येथील कृषी उत्पन्न बाजार समितीने शेतकºयांना आणि व्यापाºयांना कोणत्याही पूर्वसूचना न देता भाजीपाला विक्री केंद्र स्थलांतरित केल्याने या बाबीला तालुक्यातील शेतकºयांनी कडवा विरोध करीत शनिवारी मुंबई - आग्रा महामार्गावर ठिय्या मांडून रास्ता रोको आंदोलन केले. तसेच सर्वच भाजीपाल्याला मिळणाºया कमी भावाचा निषेध केला.यावेळी संतप्त शेतकºयांनी विक्रीसाठी आणलेला शेतमाल रस्त्यावर ओतून बाजार समितीवरील आपला रोष व्यक्त केला. दरम्यान, यावेळी बाजार समितीचा एकही पदाधिकारी अथवा सचिव हजर न झाल्याने शेतकºयांनी महामार्गावर ठिय्या मांडला.घोटी बाजार समितीने शेतकºयांना आणि व्यापाºयांना कोणत्याही पूर्वसूचना न देता आज अचानक भाजीपाला विक्री केंद्र शहराबाहेर स्थलांतरित केल्याने तालुक्यातील शेतकरी आक्रमक झाला. स्थलांतरित केलेल्या जागेत कोणत्याही सोयीसुविधा न देता बाजार स्थलांतरित करण्याचा एकतर्फी निर्णय बाजार समितीने घेतल्याने या निर्णयाच्या निषेधार्थ सकाळी ८ वाजता सर्व शेतकरी संघटित होत शेतकरी नेते पांडुरंग शिंदे यांच्या नेतृत्वाखाली रस्त्यावर उतरले. मुंबई- आग्रा महामार्गावर या शेतकºयांनी ठिय्या मांडत महामार्ग रोखून धरला.बाजार समितीवर भाजीपाला विक्री केंद्र आहे त्याच ठिकाणी ठेवून शेतकºयांना मूलभूत सुविधा द्याव्यात, शेतमालाला हमीभाव मिळावा, अशा मागण्या करीत शेतकºयांनी विक्रीसाठी आणलेला शेतमाल रस्त्यावर ओतून दिला. लेखी आश्वासनानंतर आंदोलन मागे आंदोलनामुळे महामार्गावरील वाहतूक तब्बल दोन तास ठप्प झाल्याने वाहनाच्या दुतर्फा लांबच लांब रांगा लागल्या होत्या.दरम्यान, यावेळी बाजार समितीच्या वतीने संदीप गुळवे, गोरख बोडके, ज्ञानेश्वर लहाने सचिव संजय सांगळे, तहसीलदार अनिल पुरे आदींनी आंदोलकांची भेट घेऊन आंदोलन मागे घेण्याची विनंती केली. मात्र आपल्या मागण्यांबाबत लेखी ग्वाही मिळत नाही तोपर्यंत आंदोलन चालू ठेवण्याचा निर्णय आंदोलकांनी घेतला.अखेर बाजार समितीच्या वतीने मागण्या मान्य केल्याचे लेखी आश्वासन दिल्यानंतर आंदोलन मागे घेण्यात आले. बाजार समितीने स्थलांतरित केलेल्या बाजार जागेला सकारात्मक प्रतिसाद दिला होता. या नवीन जागेत शेतमालही आणला होता. मात्र या ठिकाणी व्यापाºयांनी पाठ फिरविल्याने अनेकांना ग्राहकच मिळेना यामुळे शेतकºयांचा उद्रेक झाला आणि उद्रेकाचे रूपांतर आंदोलनात झाले.घोटी बाजार समिती आवार कमी पडत असल्याने काही शेतमाल घोटीच्या बाहेर विक्री करण्यासाठी शहराबाहेर जागा भाडेतत्त्वावर घेण्यात आली होती. यामुळे शहराचा वाहतूक कोंडीचा प्रश्न निकाली निघणार होता. यासाठी अंतिम निर्णय घेण्यासाठी येत्या सोमवारी शेतकरी प्रतिनिधी आणि बाजार समिती प्रतिनिधी यांची बैठक बोलविण्यात आली यात अंतिम निर्णय घेण्यात येणार आहे.- गोरख बोडके, उपसभापती,घोटी बाजार समितीबाजार समितीने स्थलांतरित केलेल्या जागेत कोणत्याही सुविधा दिल्या नाहीत. या ठिकाणी पिण्याचे पाणी, वीज, निवाराशेड, शौचालये आदी सुविधा देणे क्र मप्राप्त होते. मात्र अशा कोणत्याही सुविधा बाजार समितीने दिल्या नसल्याने भाजीपाल्याची होणारी हेळसांड आणि शेतकºयांचे नुकसान टाळण्यासाठी हे आंदोलन करण्यात आले. मात्र या आंदोलनाचा सकारात्मक निर्णय झाला.- पांडुरंग शिंदे, शेतकरी नेते
घोटीत शेतकऱ्यांनी रोखला महामार्ग भाजीपाला रस्त्यावर ओतून संताप
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: March 18, 2018 12:01 AM
घोटी : येथील कृषी उत्पन्न बाजार समितीने शेतकºयांना आणि व्यापाºयांना कोणत्याही पूर्वसूचना न देता भाजीपाला विक्री केंद्र स्थलांतरित केल्याने या बाबीला तालुक्यातील शेतकºयांनी कडवा विरोध करीत शनिवारी मुंबई - आग्रा महामार्गावर ठिय्या मांडून रास्ता रोको आंदोलन केले. तसेच सर्वच भाजीपाल्याला मिळणाºया कमी भावाचा निषेध केला.
ठळक मुद्देभाजीबाजार स्थलांतराला विरोध ;कवडीमोल भावाचा निषेधदुतर्फा वाहनांच्या लांबच लांब रांगा ;बाजार समिती पदाधिकारी गैरहजर