मालेगाव : कोरोनाचे हॉटस्पॉट बनलेल्या मालेगाव शहरात कोरोना पॉझिटिव्ह रुग्णांची संख्या रोज वाढत असतानाच मृतांची संख्याही वाढू लागली आहे. गुरुवारी दोन जणांचा मृत्यू झाल्याने आता मृतांची संख्या आठ झाली आहे. यामुळे नागरिकांमध्ये भीतीचे वातावरण निर्माण झाले आहे.महापालिका प्रशासनातर्फे नागरिकांना घरातून बाहेर न पडण्याचे आवाहन करण्यात येत असून, मनपातर्फे कठोर पावले उचलली जात आहेत. रविवारपर्यंत कोरोनाबाधित रुग्णांची संख्या ८५ होती, मात्र सोमवारी (दि.२०) सामान्य रुग्णालयात उपचार घेत असलेल्या ५४ वर्षीय महिलेचा पहाटे ४ वाजेच्या सुमारास मृत्यू झाला. जीवन हॉस्पिटलमध्ये दाखल असलेल्या ५५ वर्षीय इसमाचा उपचार घेताना मृत्यू झाला. यामुळे मालेगावातील मृतांची संख्या आता आठवर पोहोचली आहे.शहरात कोरोनाचे रुग्ण आढळलेल्या परिसरातील रस्ते बंद केलेले असतानाच त्या-त्या भागात पोलीस बंदोबस्त वाढविल्याने लष्कराचे स्वरूप आले आहे. मनपातर्फे ध्वनीक्षेपकावरून नागरिकांना घराबाहेर न पडण्याचे आवाहन केले जात आहे.मृतांची संख्या वाढू लागल्याने प्रशासनही चांगलेच हादरले असून, राज्याचे कृषिमंत्री दादा भुसे यांच्या उपस्थितीत मनपासह सर्व अधिकाऱ्यांच्या बैठका सुरू आहेत. रविवारी कृषिमंत्री भुसे यांनी महापालिकेत अधिकाऱ्यांबरोबरच नगरसेवकांच्यादेखील बैठका घेतल्या. शिवाय खासगी डॉक्टरांची बैठक घेऊन रुग्णांवर उपचारकरून त्याचे प्राण कसेवाचतील यासंदर्भात भोपाळच्या वरिष्ठ डॉक्टरांशी चर्चा घडवून आणली.मालेगावमध्ये कोरोनाचा कहर सुरूच असून, शहरात पूर्णत: लॉकडाउन करण्यात आले आहे. त्यामुळे घराबाहेर पडणाºया नागरिकांवर करडी नजर ठेवली जात आहे. पोलिसांनी ठिकठिकाणी बॅरिकेड्स लावून रस्ते बंद केले आहेत, तर विनाकारण बाहेर फिरणाºयांवर कारवाई केली जात असल्याची माहिती पोलीस सूत्रांनी दिली.
मालेगावी दोघांचा मृत्यू
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: April 20, 2020 11:26 PM
कोरोनाचे हॉटस्पॉट बनलेल्या मालेगाव शहरात कोरोना पॉझिटिव्ह रुग्णांची संख्या रोज वाढत असतानाच मृतांची संख्याही वाढू लागली आहे. गुरुवारी दोन जणांचा मृत्यू झाल्याने आता मृतांची संख्या आठ झाली आहे. यामुळे नागरिकांमध्ये भीतीचे वातावरण निर्माण झाले आहे.
ठळक मुद्देकोरोना हॉटस्पॉट : मृतांची संख्या आठवर; प्रशासकीय यंत्रणा सतर्क