नाशिक : लोकसभा निवडणूकीच्या मतदान प्रक्रियेनिमित्त त्र्यंबकेश्वर येथील नुतन इंग्रजी शाळा खोली क्रमांक ६ वरील मतदान प्रक्रियेचे कामकाज आटोपून सोमवारी (दि.२९) सायंकाळी घराच्या दिशेने निघालेले कृष्णा भरत सोनवणे (४६,रा. सत्यम पार्क, हिरावाडी, अमृतधाम) हे जुने सीबीएस बसस्थानकाच्या आवारात चक्कर येऊन कोसळले व त्यांचा जागीच मृत्यू झाला. याप्रकरणी सरकारवाडा पोलीस ठाण्यात अकस्मात मृत्यूची नोंद करण्यात आली आहे.शहरासह जिल्ह्यात लोकसभा निवडणूकीचे मतदान शांततेत पार पडले. कुठेही कुठलीही अनुचित घटना घडली नाही; मात्र सायंकाळच्या सुमारास निवडणूकीच्या मतदान प्रक्रियेचे कामकाज आटोपून घरी जात असलेले मविप्र संस्थेचे कर्मचारी सोनवणे यांच्यावर काळाने झडप घातली. त्र्यंबकेश्वर-नाशिक बसमधून उतरताच त्यांना चक्कर आली व ते बसस्थानकाच्या आवारात कोसळले. त्यांना उपचारार्थ जिल्हा शासकिय रूग्णालयात परिसरातील नागरिकांनी दाखल केले असता डॉक्टरांनी तपासून मयत घोषित केले. जिल्हा निवडणूक निर्णय अधिकाऱ्यांमार्फत त्यांची नियुक्ती मतदानप्रक्रियेसाठी त्र्यंबकेश्वर येथे करण्यात आली होती. याप्रकरणी त्यांचे बंधू सखाराम सोनवणे यांनी जिल्हा निवडणूक निर्णय अधिका-यांना लेखी निवेदनाद्वारे पुढील कार्यवाहीसाठी विनंती केली आहे. सोनवणे हे देवळाली येथील एसव्हीकेटी महाविद्यालयात वरिष्ठ लिपीक म्हणून कार्यरत होते. त्यांच्या मृत्यूने सर्वत्र हळहळ व्यक्त होत आहे. शोकाकूल वातावरणात त्यांच्या पार्थिवावर मंगळवारी (दि.३०) अंत्यसंस्कार करण्यात आले. त्यांच्या पश्चात आई, वडील, पत्नी, भाऊ, तीन मुले, दोन मुली असा परिवार आहे.
निवडणूकीचे कामकाज आटोपून परतणाऱ्या लिपिकाचा बसस्थानकावर मृत्यू
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: April 30, 2019 2:13 PM
त्यांच्या मृत्यूने सर्वत्र हळहळ व्यक्त होत आहे. शोकाकूल वातावरणात त्यांच्या पार्थिवावर मंगळवारी (दि.३०) अंत्यसंस्कार करण्यात आले. त्यांच्या पश्चात आई, वडील, पत्नी, भाऊ, तीन मुले, दोन मुली असा परिवार आहे.
ठळक मुद्देमविप्र संस्थेचे कर्मचारी सोनवणे यांच्यावर काळाने झडप घातली.जुने सीबीएस बसस्थानकाच्या आवारात चक्कर येऊन कोसळले