शहरं
Join us  
Trending Stories
1
शरद पवार, उद्धव ठाकरेंचे राजकारण संपले? दोघांनाही आहे अजून एकेक संधी...
2
IPL Auction 2025: कृणाल पांड्या, नितीश राणासाठी RR vs RCB मध्ये रंगला 'रॉयल' सामना! कुणाचा झाला फायदा?
3
आदित्य ठाकरेंच्या नावाचा आग्रह केला पण...; विरोधी पक्षनेते पदावर भास्कर जाधव काय म्हणाले?
4
IPL Auction 2025 : मुंबईकर अजिंक्य, पृथ्वी अन् शार्दुलसह या स्टार खेळाडूंना अनसोल्डचा टॅग
5
म्युच्युअल फंडात गुंतवणूक करता का? काय आहेत समज, गैरसमज; जाणून घेऊ सर्व प्रश्नांची उत्तरं
6
राष्ट्रवादीचे नेते दिलीप वळसे पाटील शरद पवारांच्या भेटीला; कारणही आलं समोर
7
प्रदेशाध्यक्ष पदाचा राजीनामा दिल्याच्या चर्चांवर नाना पटोलेंनी सोडलं मौन; म्हणाले...
8
देवेंद्र फडणवीस पुन्हा मुख्यमंत्री होणार? मनोज जरांगे पाटील स्पष्टच बोलले; म्हणाले...
9
उद्धव ठाकरे यांनी आदित्य ठाकरे आणि सुनील प्रभूंवर सोपवली मोठी जबाबदारी, या पदांवर केली नियुक्ती 
10
पुन्हा पक्षफुटीची भीती? उद्धव ठाकरेंची खास रणनीती, नव्या २० आमदारांना शपथबद्ध करणार!
11
जिओची धमाकेदार ऑफर, 50 दिवसांपर्यंत मिळेल सुपरफास्ट इंटरनेट!
12
Animal चा समाजावर वाईट परिणाम; रणबीर कपूर म्हणाला, "मलाही तुमचं मान्य आहे..."
13
"अजित पवार यांना मुख्यमंत्री, तर मला मंत्री करा’’, राष्ट्रवादीच्या आमदाराने व्यक्त केली इच्छा
14
थोरातांच्या पराभवानंतर सत्यजित तांबे अजित पवारांच्या भेटीला; म्हणाले, "त्यांच्यासारखा माणूस..."
15
"बिहार खड्ड्यात गेलाय’’, पोटनिवडणुकीतील पराभवानंतर प्रशांत किशोर यांची प्रतिक्रिया 
16
पेन्शनधारकांनो, नो टेन्शन; हयातीचा दाखला मिळणार घरपोच!
17
IND vs AUS :आम्ही दबावात होतो; पण... बुमराहनं शेअर कमबॅक मागची स्टोरी
18
IPL Auction 2025: "थोडे जास्तच पैसे गेले, आम्ही रिषभ पंतसाठी..."; LSGच्या मालकांनी सांगितला 'फसलेला' प्लॅन
19
Gold Silver Price Today : सोन्या-चांदीच्या दरात मोठी घसरण; पटापट चेक करा दिल्ली ते कोलकात्यापर्यंतचे दर
20
"कुटुंबात 4 जण, मतं मिळाली फक्त 2", 'तो' व्हिडीओ शेअर करत अभिनेत्यानं EVM वर घेतला संशय

खासगी मध्यामिक शाळांमध्ये रचनावादाचे मरण, रमेश पानसे यांची खंत

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: December 14, 2019 7:25 PM

जिल्हा परिषदेच्या शाळांमधील विद्यार्थ्यांना आत्मविश्वास, आनंद आणि निर्णयक्षमता निर्माण करणारे रचनावादी शिक्षण दिले जात असले तरी माध्यमिक शिक्षण देणाऱ्या बहुतांश शाळा खासगी संस्थांच्या असून येथे रचनावाद मारला जात असल्याची खंत व्यक्त करतानाच व्ही. एन. नाईक शिक्षण संस्थेसारख्या सामाजिक सेवा क्षेत्रातील संस्थांनी मराठी माध्यमाच्या शाळांकडे लक्ष केंंद्रीत करण्यासोबतच बारावीपर्यंतच्या शिक्षणात रचनावाद अंगीकारण्याचे आवाहन ज्येष्ठ शिक्षणतज्ज्ञ रमेश पानसे यांनी केले आहे.

ठळक मुद्दे समाधानकारक शिक्षणासाठी रचनावाद पद्धतीचा उपाय ज्येष्ठ शिक्षणतज्ज्ञ रमेश पानसे यांचे प्रतिपादन

नाशिक : राज्यातील जिल्हा परिषदेच्या शाळांमधील विद्यार्थ्यांना आत्मविश्वास, आनंद आणि निर्णयक्षमता निर्माण करणारे रचनावादी शिक्षण दिले जात असले तरी माध्यमिक शिक्षण देणाऱ्या बहुतांश शाळा खासगी संस्थांच्या असून येथे रचनावाद मारला जात असल्याची खंत व्यक्त करतानाच व्ही. एन. नाईक शिक्षण संस्थेसारख्या सामाजिक सेवा क्षेत्रातील संस्थांनी मराठी माध्यमाच्या शाळांकडे लक्ष केंंद्रीत करण्यासोबतच बारावीपर्यंतच्या शिक्षणात रचनावाद अंगीकारण्याचे आवाहन ज्येष्ठ शिक्षणतज्ज्ञ रमेश पानसे यांनी केले आहे. शालेय शिक्षण समाधानकारक करण्यासाठी रचनावाद शिक्षण पद्धती एममेव उपाय असल्याचेही त्यांनी यावेळी अधोरेखीत केले. क्रांतीवीर वंसतराव नारायणराव नाईक शिक्षण प्रसारक संस्थेतर्फे  क्रांतीवीर वसंतराव नाईक यांच्या ५१ व्या पुण्यतिथनिमित्त ते बोलत होते. के. व्ही. एन. नाईक  महाविद्यालयाच्या संस्थेचे अध्यक्ष पंढरीनाथ थोरे यांच्या अध्यक्षतेत झालेल्या पुण्यतिथी कार्यक्रमात व्यासपीठावर आमदार नरेंद्र दराडे, नगरसेवक कमलेश बोडके, पुष्पा आव्हाड, पंडित येलमामे, पा. भा. करंजकर, संस्थेचे उपाध्यक्ष पी. आर. गीते, योगाचार्य प्रज्ञा पाटील आदी उपस्थित होते. पानसे म्हणाले, जगातील सर्वात तरुण असलेल्या भारतात तरुणांना योग्य शिक्षणाच्या संधी उपलब्ध करून देण्याची आपली जबाबदारी अअसल्याचे अधोरेखीत करताना मुलांना इंग्रजीऐवजी मराठी माध्यमातूनच शिक्षण देण्याचे आवाहन त्यांनी केले. केद्र सरकारने २०१४ पासून रचनावादी शिक्षणासाठी पुढाकार घेतला असून त्यानुसार आराखडाही तयार करण्यात आला आहे. परंतु, २००९ मध्ये आलेल्या शिक्षण हक्क कायद्यातही रचनावादी शिक्षण पद्धती अस्तिवात आणण्याचा केला गेला असतानाही प्रत्यक्षात मात्र दहा वर्ष होऊनही ही पद्धती वर्गात अमंलात आणली जात नसल्याची खंत त्यांनी व्यक्त केली.  दरम्यान, विद्यार्थी दशेतील विद्यार्थी संघटनेच्या माध्यमातून स्वांतत्र्य चळवळीत सक्रीय सहभाग याविषयी विविध प्रसंगांच्या माध्यमातून संस्थेचे अध्यक्ष पंढरीनाथ थोरे यांनी  क्रांतीवीर वसंतराव नाईक यांच्या कार्याला उजाळा दिला. 

टॅग्स :Education Sectorशिक्षण क्षेत्रNashikनाशिकSchoolशाळाEducationशिक्षण