सायखेडा : गावात पहिला कोरोनाबधित रुग्ण आढळला असून, परिसर १४ दिवसांसाठी कंटेन्मेंट झोन म्हणून जाहीर करण्यात आला आहे, तर सायखेडा गाव पाच दिवसांसाठी पूर्णपणे बंद करण्यात आले आहे. दरम्यान चाटोरी येथील ८५ वर्षीय महिलेचा अहवाल पॉझिटिव्ह आला. वय आणि विविध आजारांनी ग्रासलेल्या या बाधित महिलेचा शासकीय रु ग्णालयात उपचार सुरू असताना मृत्यू झाला.चाकूर येथील एकाच कुटुंबातील तीन रु ग्ण पॉझिटिव्ह आढळले होते. त्यापैकी दोन रु ग्ण रु ग्णालयात उपचार घेत आहेत, तर एका रु ग्णाचा मृत्यू झाल्याने खळबळ उडाली आहे. याच कुटुंबातील आणखी काही लोकांचे नमुने तपासणीसाठी जिल्हा प्रशासनाने घेतले आहेत. दरम्यान सायखेड्यात सापडलेला रुग्ण व्यवसायाने डॉक्टर असल्याने त्यांच्या संपर्कात आलेल्या लोकांचा शोध घेण्याचे आवाहन प्रशासनापुढे उभे ठाकले आहे. गोदाकाठची धाकधूक वाढली आहे. निफाड तालुक्यातील सर्व भागांमध्ये कोरोना रु ग्ण आढळले होते. मात्र सायखेडा येथे एकही रुग्ण नसल्याने प्रशासन व नागरिक चिंतामुक्त होते. परंतु सोमवारी आलेल्या अहवालात एक जण बाधित आढळ्याने सर्वत्र चिंतेचे वातावरण पसरले आहे.-----------------तिघांची घरवापसीलासलगाव : ग्रामीण रु ग्णालयातील कोरोना कोविड उपचार केंद्रातील तीन जण ठणठणीत बरे झाले आहेत. त्यांना सोमवारी (दि. १५) रु ग्णवाहिकेतून त्यांच्या घरी सोडण्यात आले. यावेळी नाशिक येथील निवासी वैद्यकीय अधिकारी डॉ. अनंतराव पवार, लासलगाव येथील कोविड केंद्राचे नोडल आॅफिसर डॉ. राजाराम सैंद्रे, लासलगाव ग्रामीण रुग्णालयाचे वैद्यकीय अधीक्षक डॉ. बाळकृष्ण अहिरे आदी उपस्थित होते.--------------------पिंपळगावला आणखी एक कोरोनाबाधितपिंपळगाव बसवंत : शहरातील मुस्लीम गल्ली भागातील ७५ वर्षीय व्यक्तीला कोरोनाची बाधा झाल्याचे समोर आले आहे. शहरात आतापर्यंत पाच बाधित झाले आहेत.नव्या रुग्णाच्या घशाचे स्वॅब घेतले होते. सोमवारी (दि. १५) आलेल्या अहवालात त्यास कोरोनाची बाधा झाल्याचे समोर आले आहे, तर त्याच्या संपर्कातील कुटुंबातील सदस्यांना होम क्वॉरण्टाइन केले आहे.
चाटोरी येथील कोरोनाबाधिताचा मृत्यू
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: June 15, 2020 9:31 PM