सिन्नर : तालुक्यातील बेलू येथील माजी सैनिकाचा स्वाईन प्लूसदृश आजाराने खासगी रूग्णालयात मृत्यू झाल्याची घटना घडली. आगासखिंड येथील एका वृध्दासही या आजाराची लागण झाल्याची निष्पन झाल्याने घबराट निर्माण झाली आहे. आरोग्य विभागाने तात्काळ उपाययोजना सुरू केल्या आहेत. बेलू येथील माजी सैनिक त्र्यंबक भिकाजी वारूंगसे (५८) हे लष्करातून निवृत्त झाल्याने शेती व्यवसाय करत होते. काही दिवसांपूर्वीच त्यांची तब्येत बिघडल्याने त्यांना रूग्णालयात दाखल करण्यात आले होते. प्राथमिक तपासणीत स्वाईन फ्लूची लक्षणे आढळल्याने त्यांची एच १ एन १ ची तपासणी करण्यात आली. या टेस्टचा अहवाल पॉझिटीव्ह आला होता. शनिवारी त्यांचा स्वाईन फ्लू व कार्डियाक रेस्पिरेटरी अरेस्टमुळे खासगी रूग्णालयात मृत्यू झाला. आगासखिंड येथील वृध्द रामदास रावजी आरोटे यांच्याही एच १ एन २ तपासणी पॉझिटीव्ह आल्याचे वृत्त असून स्वाईन फ्लू आजाराच्या साथीचे गांभीर्य लक्षात घेवून तालुका वैद्यकीय अधिकारी डॉ. मोहन बच्छाव यांच्या मार्गदर्शनाखाली पांढुर्ली प्राथमिक आरोग्य केंद्रातर्फे स्वाईन फ्लू सदृश रूग्णांवर टॉमीफ्लू औषधाबरोबरच परिसरात जनजागृती करण्यात येत आहे. आगासखिंड येथेही स्वाईन फ्लू सदृश रूग्ण आढळल्याने आरोग्य विभागातर्फे परिसरात स्वाईन फ्लू सदृश रूग्णांची तपासणी करण्यात आली. पांढुर्ली प्राथमिक आरोग्य केंद्राच्या कार्यक्षेत्रातील कोनांबे येथेही अण्णा काशीनाथ डावरे यांचे स्वाईन फ्लूने निधन झाले होते. त्यानंतर आरोग्य विभागातर्फे डॉ. लहू पाटील व डॉ. सुप्रिया वेटक ोळी यांनी गावातील साडेचारशे रूग्णांची तपासणी करून स्वाईन फ्लू सदृश रूग्णांवर औषधोपचार सुरू केले होते. नागरिकांनी घाबरून न जाता सर्दी, खोकला, ताप असे लक्षणे आढल्यास त्वरीत वैद्यकीय सल्ला घ्यावा. ज्या रूग्णांचा श्वसनाचा व हृदयरोगाचा त्रास आहे अशांनी गर्दीत जाणे टाळावे. असे आवाहन तालुका वैद्यकीय अधिकारी डॉ. बच्छाव यांनी केले आहे.
बेलू येथे स्वाईन फ्लू सदृश आजाराने माजी सैनिकाचा मृत्यू
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: October 08, 2018 4:05 PM
सिन्नर : तालुक्यातील बेलू येथील माजी सैनिकाचा स्वाईन प्लूसदृश आजाराने खासगी रूग्णालयात मृत्यू झाल्याची घटना घडली. आगासखिंड येथील एका वृध्दासही या आजाराची लागण झाल्याची निष्पन झाल्याने घबराट निर्माण झाली आहे
ठळक मुद्दे नागरिकांनी घाबरून न जाता सर्दी, खोकला, ताप असे लक्षणे आढल्यास त्वरीत वैद्यकीय सल्ला घ्यावा.