नाशिक : कोबीच्या रोपांवर औषध फवारणी करीत असताना औषधाचा त्रास होऊन साठवर्षीय शेतकºयाचा मृत्यू झाल्याची घटना शुक्रवारी (दि़ ८) दुपारी मातोरी येथे घडली़ निवृत्ती दामू पिंगळे (रा़ मातोरी, दरी रोड, ता़ जि़ नाशिक) असे मृत्यू झालेल्या शेतकºयाचे नाव आहे़ दरम्यान, या मृत्यूची नाशिक तालुका पोलीस ठाण्यात नोंद करण्यात आली आहे़ पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, नाशिक शहराजवळील मातोरी-दरी रोडवर निवृत्ती पिंगळे यांची शेती आहे़या शेतीमध्ये त्यांनी कोबीची रोपे टाकलेली असून, दुपारी १ वाजेच्या सुमारास कोबीच्या रोपांवर कोडायझन नावाच्या औषधाची फवारणी करीत होते़ रोपावर औषधाची फवारणी करीत असताना त्यांना औषधाचा त्रास होऊ लागल्याने त्यांचा मुलगा पोलीसपाटील रमेश निवृत्ती पिंगळे यांनी उपचारासाठी जिल्हा रुग्णालयात दाखल केले होते़ त्यांच्यावर उपचार सुरू असताना ३ वाजेच्या सुमारास त्यांचा मृत्यू झाल्याचे डॉ़ गडे यांनी घोषित केले़ दरम्यान, वैद्यकीय अधिकाºयांनी व्हिसेरा राखून ठेवला असून, न्यायवैद्यक प्रयोगशाळेच्या अहवालानंतर मृत्यूचे कारण स्पष्ट होणार आहे. च्औषध फवारणीच्या औषधाचा त्रास होऊ लागल्याने पिंगळे यांना उपचारासाठी जिल्हा रुग्णालयात दाखल केले असता उपचारादरम्यान त्यांचा मृत्यू झाल्याची नोंद रुग्णालयात करण्यात आली आहे, तर हा मृत्यू संशयास्पद असल्याची शक्यता जिल्हा रुग्णालयाचे अतिरिक्त जिल्हा शल्य चिकित्सक डॉ़ जी़ एम़ होले यांनी व्यक्त केली आहे़ पिंगळे यांच्या शरीरात कीटकनाशकाचे प्रमाण अधिक आढळून आल्याने विष प्राशन केल्याचा प्राथमिक अंदाज व्यक्त करण्यात आला आहे़
फवारणीदरम्यान मातोरीतील वृद्ध शेतकºयाचा मृत्यू
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: December 09, 2017 12:58 AM