दिंडोरी : तालुक्यातील इंदोरे येथील ढाकणे कुटुंबात शेतीच्या वाटणीवरून वाद झाल्याने सात संशयितांनी मिळून मारहाण केलेले फिर्यादी वसंत लक्ष्मण ढाकणे (४६) यांचा १७ दिवसांनंतर मुंबई येथे जे.जे. रु ग्णालयात उपचार घेत असताना सोमवारी (दि.२१) मृत्यू झाला.दिंडोरी पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, इंदोरे येथील अनिल पंढरीनाथ ढाकणे, अंकुश पंढरीनाथ ढाकणे, निवृत्ती रामनाथ ढाकणे,अनिल संजय ढाकणे, संजय बाबूराव ढाकणे, बाबूराव रामनाथ ढाकणे, रामनाथ बाबूराव ढाकणे यांचे वसंत लक्ष्मण ढाकणे (रा. माळेगाव एमआयडीसी, ता. सिन्नर) यांच्यात शेतीच्या वाटणीवरून न्यायालयात वाद सुरू होते. वाटपात न्यायालयाने वसंत ढाकणे यांच्या बाजूने निकाल दिला होता. तरीही संशयित शेतीचा हिस्सा देत नसल्याने वसंत ढाकणे यांनी ४ जानेवारी रोजी त्यांच्या हिस्स्याचे क्षेत्र विक्रीसाठी ग्राहक घेऊन इंदोरे येथे शेतात आले होते. त्यावेळी ७ जणांनी मिळून त्यांना जबर मारहाण केली होती. मारहाणीत वसंत ढाकणे जखमी झाले होते.संशयित जामिनावर४ जानेवारीला घटना घडली त्यानंतर चारही संशयितांना दिंडोरी पोलिसांनी अटक केली होती. त्यानंतर न्यायालयाने त्यांची जामिनावर सुटका केली होती. परंतु फिर्यादीचा उपचारादरम्यान मृत्यू झाल्याने आता त्यांच्यावर आणखी कलम लावण्यात आले आहेत.
भाऊबंदकीच्या वादातून एकाचा उपचारानंतर मृत्यू
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: January 23, 2019 12:57 AM