तरत्र्यंबकेश्वर: अंजनेरी शिवारातील नाशिक त्र्यंबकेश्वर राज्य महामार्गावर त्र्यंबकेश्वरहुन दर्शन घेऊन नाशिक कडे जात असलेल्या बलेनो कार टी एस ७ यु एफ ४२२८ हीस पाठीमागुन आलेल्या महिन्द्रा मरांझो कार एम एच १५जी एल ५७५७हीने जोरदार धडक दिली. त्यात बलोने कार चालक साईनाथ मुक्का (२२)जागीच ठार झाला. कारमधील संजीव विरा रेड्डी (२२) अन्वेश श्रीनिवास पोटामल्ली (२१) साईकुमार बिकुमल्ली मुरलीधरन (२२) रवितेजा विरेका (२२) हे जबर जखमी झाले आहेत.फिर्यादी संजीव विरा रेड्डी यांनी फिर्याद दाखल केली.बलेनो कारमधील सर्व विद्यार्थी तेलंगणा मधील आहेत. महिन्द्र कार चालक (नाव गाव माहित नाही) यांच्या विरु ध्द त्र्यंबकेश्वर पोलीस ठाण्यात फिर्याद दाखल करु न घेतली.बलोने कारमधील सर्व विद्यार्थी त्र्यंबकेश्वर दर्शनासाठी त्र्यंबकेश्वर येथे दि.२३ जुन रोजी त्र्यंबकेश्वर दर्शन घेउन परत दुपार नंतर साडे चारला अंजनेरी शिवारातुन जात असतांना श्री गणेश मंदिराकडे दर्शन घेण्यासाठी गाडी वळवित असतांना त्र्यंबक कडुनच भरधाव वेगाने महिन्द्रा मरांझो कारने मंदिराकडे वळत असलेल्या बलोनेकारला जोरदार धडक देऊन कार चालक साईनाथ मुक्का (२२) हा जागीच ठार झाला. तर अन्य तीन जण जखमी झाले.
त्र्यंबकेश्वर रस्त्यावर एकाचा मृत्यू
By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: June 25, 2019 14:01 IST
त्र्यंबकेश्वर: अंजनेरी शिवारातील नाशिक त्र्यंबकेश्वर राज्य महामार्गावर त्र्यंबकेश्वरहुन दर्शन घेऊन नाशिक कडे जात असलेल्या बलेनो कार टी एस ७ यु एफ ४२२८ हीस पाठीमागुन आलेल्या महिन्द्रा मरांझो कार एम एच १५जी एल ५७५७हीने जोरदार धडक दिली. त्यात बलोने कार चालक साईनाथ मुक्का (२२)जागीच ठार झाला.
त्र्यंबकेश्वर रस्त्यावर एकाचा मृत्यू
ठळक मुद्दे त्र्यंबकेश्वर: एका कारला दुस-या कारने मागुन धडक दिल्याने अपघातात, तीन जखमी