नाशिक : हिरावाडीमध्ये मनपाच्या क्र ीडा संकुलाच्या आवारातीलस्वर्गीय श्रीकांतजी ठाकरे जलतरण तलावात पोहण्यासाठी आलेल्या दिंडोरीरोडवरील कलानगरचा साई संदीप वाणी(१३) मुलाचा बुडून मृत्यू झाल्याची घटना काल बुधवारी (दि.५) सायंकाळी उघडकीस आली. याबाबत पंचवटी पोलीसांनीअकस्मात मृत्यूची नोंद केली आहे.दोन दिवसांपूर्वीच मनपाच्या सावरकर जलतरण तलावात सूर मारल्यानंतर बुडालेल्या तेवीस वर्षीय युवकाला वाचविण्याच यश आले होते. ही घटना ताजी असतानाच हिरावाडीतील मनपाच्या तलावात युवक बुडाल्याची घटना घडली. कलानगरमधील डी ऐ क्लासिक अपार्टमेंटमध्ये राहणारा साई वाणी हिरावाडीतील जलतरण तलावात बुधवारी सायंकाळी पोहण्यासाठी आला होता. सायंकाळी त्याने सात वाजेच्या सुमारास पाण्यात उडी मारली असता त्याला पाण्याचा अंदाज बांधता आला नाही. परिणामी तो पाण्यात बुडाला. मुलगा बुडाला असल्याची घटना तरण तलावातील कर्मचारी दीपक सुर्वे यांच्या लक्षात येताच त्यांनी तत्काळ पाण्यात उडी घेऊन बुडालेल्या साईला बेशुद्धावस्थेत पाण्याबाहेर काढले व त्यानंतर लागलीच त्याला जिल्हा रु ग्णालयात उपचारासाठी दाखल केले; मात्र तेथे उपचार सुरू असताना डॉक्टरांनी त्याला तपासून मयत घोषित केले. साईच्या नाकातोंडात पाणी गेल्याने त्याचा मृत्यू झाला.सह ठेकेदाराकडून दिशाभूल?हिरावाडीतील स्वर्गीय श्रीकांत ठाकरे जलतरण तलाव चालविण्याचा ठेका मुंबईच्या क्लोरिनेशन इंजिनियर यांना दिला आहे; मात्र त्यांनी देखील हा ठेका पुन्हा दुसऱ्या ठेकेदाराला दिल्याचे समजते. या कंपनीने नेमलेल्या सहठेकेदाराकडून दिशाभूल करून त्याने आपला तरण तलावाचा ठेका नाही व काही एक संबंध नसल्याचे संबंध नसल्याचे सांगून माहिती दडविण्याचा प्रयत्न केला. विशेष म्हणजे, महापालिका प्रशासनाला देखील पंचवटीतील जलतरण तलावाचा ठेका नेमका कोणाकडे आहे, याबाबत पुरेशी माहिती नसल्याने आश्चर्य व्यक्त केले जात आहे. एकूणच मनपा व ठेकेदाराच्या गलथानकारभारामुळे मुलाचा बळी गेल्याचे बोलले जात आहे.
हिरावाडीत मनपाच्या तरणतलावात बुडून शाळकरी मुलाचा मृत्यू
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: June 06, 2019 2:01 PM
बुडालेल्या साईला बेशुद्धावस्थेत पाण्याबाहेर काढले व त्यानंतर लागलीच त्याला जिल्हा रु ग्णालयात उपचारासाठी दाखल केले; मात्र तेथे उपचार सुरू असताना डॉक्टरांनी त्याला तपासून मयत घोषित केले. साईच्या नाकातोंडात पाणी गेल्याने त्याचा मृत्यू झाला.
ठळक मुद्देमनपा व ठेकेदाराच्या गलथानकारभारामुळे मुलाचा बळी साईच्या नाकातोंडात पाणी गेल्याने त्याचा मृत्यू झाला.