घोटी : परिसरातील श्रीकृष्णनगरात राहणाऱ्या एका नऊ वर्षाच्या बालकाचा भोवरा खेळत असताना सर्पदंशाने मृत्यू झाला. जिल्हा परिषदेच्या प्राथमिक शाळेत दुसºया इयत्तेत शिकणाºया प्रतीक विजय पवार (९) असे या दुर्दैवी मुलाचे नाव आहे. त्याच्या पश्चात आईवडील व एक बहीण असा परिवार आहे.दि. ८ एप्रिल रोजी त्याचा तो राहत असलेल्या झोपडपट्टीत वाढदिवस साजरा झाला होता. मोलमजुरी करणारे त्याचे आईवडील व झोपडपट्टीतील त्याचे सवंगडी यावेळी उपस्थित होते. श्रीकृष्ण नगरातील असंख्य मुलांमध्ये सतत बागडणारा व प्रसंगी आईवडिलांना मोलमजुरीत मदत करणारा प्रतीक परिसरातील बालकांचा चांगला मित्र होता. शाळेतही तो हुशार होता. उन्हाळ्याच्या सुट्यांमध्ये झाडाच्या सावलीत भोवरा खेळणाºया मुलांमध्ये हसणारा बागडणारा प्रतीक आनंदात उन्हाळ्याची सुट्टी घालवित होता. दोन दिवसांपूर्वी एका झाडाखाली दुपारी भोवºयाचा डाव मांडला असताना प्रतीकचा भोवरा समोरच्या पाइपमध्ये गेला. याठिकाणी दगडविटा व अडचण होती. दगडांमध्ये भोवरा गेल्यानंतर एका विटेखाली तो काढण्यासाठी प्रतीकने हात घातला परंतु भोवरा हाती लागण्याआधीच सर्पाने त्याचा हाताला दंश केला. यातच प्रतीक मृत्यू झाला.परिसरात विषारी सर्पांचे वास्तव्यदोन-अडीच फूट लांबीच्या सर्पाने दंश करताच त्याच्या हाताला विळखा घातला. प्रतीकने हात झटकताच सर्प फेकला गेला. ही बाब त्याच्या सवंगड्यांनीही बघितली. प्रतीक घाबरला व पळतच आईकडे गेला व तिला सर्पाने दंश केल्याचे सांगत हातावरील जखमी दाखविली. तिने तात्काळ घोटीच्या ग्रामीण रुग्णालयात नेले. प्राथमिक उपचारानंतर प्रतीकला नाशिकला जिल्हा रुग्णालयात पाठविण्यात आले. परंतु उपचार सुरू असतानाच प्रतीकचे निधन झाले. हे वृत्त समजताच घोटी परिसरात हळहळ व्यक्त करण्यात येत आहे.
घोटी परिसरातील बालकाचा सर्पदंशाने मृत्यू
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: April 28, 2018 12:35 AM