पिंपळगाव बसवंत : परिसरातील नारायण टेंभी येथील प्रगतिशील शेतकरी व पिंपळगाव बसवंत विविध कार्यकारी सोसायटीचे संचालक संतोष फकिरा देवकर (४२) यांना विजेचा धक्का लागून यांचा जागेवरच मृत्यू झाल्याची घटना बुधवारी (दि.१०) सायंकाळी साडेपाच वाजेच्या सुमारास घडली.नारायण टेंभी रोडवरील देवकर वस्तीत सायंकाळी साडेपाच वाजेच्या सुमारास संतोष देवकर आपल्या शेतात फेरफटका मारत असताना त्यांचा अचानक विजेच्या खांबाला हात लागला. त्यात जोरदार धक्का बसल्याने त्यांचा जागेवरच मृत्यू झाला. पिंपळगाव आरोग्य केंद्रात शवविच्छेदन करण्यात आल्यानंतर त्यांच्या पार्थिवावर शोकाकुल वातावरणात अंत्यसंस्कार करण्यात आले. याप्रकरणी पिंपळगाव बसवंत पोलीस ठाण्यात आकस्मित मृत्यूची नोंद करण्यात आली असून, पोलीस निरीक्षक संजय महाजन यांच्या मार्गदर्शनाखाली हवालदार पंडित वाघ अधिक तपास करत आहेत.
सोसायटी संचालकाचा विजेच्या धक्क्याने मृत्यू
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: July 11, 2019 1:02 AM
पिंपळगाव बसवंत : परिसरातील नारायण टेंभी येथील प्रगतिशील शेतकरी व पिंपळगाव बसवंत विविध कार्यकारी सोसायटीचे संचालक संतोष फकिरा देवकर (वय ४२) यांना विजेचा धक्का लागून यांचा जागेवरच मृत्यू झाल्याची घटना बुधवारी (दि.१०) सायंकाळी साडेपाच वाजेच्या सुमारास घडली.
ठळक मुद्देजोरदार धक्का बसल्याने त्यांचा जागेवरच मृत्यू झाला.