नाशिक : चांदवड तालुक्यातील एका महिलेचा स्वाइन फ्लूने येथील एका खासगी रुग्णालयामध्ये मृत्यू झाला आहे. सोग्रस येथील सुनीता चिंधू गांगुर्डे (३३) यांना स्वाइन फ्लूची लागण झाली होती. त्यामुळे त्यांना ५ आॅक्टोबरपासून येथील एका खासगी रुग्णालयामध्ये उपचार सुरू होते. मात्र शनिवारी उपचार सुरू असतानाच त्यांचा मृत्यू झाला. चांदवड तालुक्यातील स्वाइन फ्लूचा हा पाचवा बळी आहे.
सोग्रसच्या महिलेचा स्वाइन फ्लूने मृत्यू
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: October 14, 2018 12:38 AM