पेठ : तालुक्यातील आंबे येथील शासकिय आश्रम शाळेतील विद्यार्थ्यांचा मृत्यू झाल्याची घटना घडली असून कर्मचाऱ्यांच्या हलगर्जीपणामुळेच मुलाचा मृत्यू झाल्याचा आरोप पालकांनी करीत संबधितावर सदोष मणूष्यवधाचा गुन्हा दाखल करण्याची मागणी केली आहे़तालुक्यातील आंबे येथील आश्रमशाळेत इयत्ता ५ वीत शिकणारा जगदिश बाळू महाले रा़ करंजखेड हा विद्यार्थी मंगळवारी खेळत असतांना शाळेच्या संरक्षक भिंतीवरून पडला़बेशुध्दावस्थेत त्याला आंबे प्राथमिक आरोग्य केंद्रात दाखल करण्यात आले़याठिकाणी उपचार केल्यानंतर त्यास अधिक उपचारासाठी नाशिक येथे हलविण्यात आले़़मात्र जगदिश यास बुधवारी नाशिकला कर्मचाऱ्याबरोबर नाशिक येथे पाठवण्यात आल्याचे पालकांचे म्हणणे असून वेळेवर उवचार न मिळाल्यामुळे तच बुधवारी दारून अंत झाला़ ही घटना कळताच करंजखेड व परिसरातील नागरिकांनी आंबे आश्रमशाळेजवळ मोठ्या प्रमाणावर गर्दी केली़मुलाच्या मृत्यूस जबाबदार असलेल्या कर्मचाऱ्यांवर कारवाई होत नाही तोपर्यंत प्रेत ताब्यात घेणार नसल्याची भूमिका पालकांनी घेतल्याने काही काळ तणावाचे वातावरण निर्माण झाले होते़पोलीस निरिक्षक व्ही़डी़ससे, आदिवासी विकास विभागाचे प्रकलपाधिकारी वाणी,राऊत यांनी परिस्थिती आटोक्यात आणण्याचा प्रय्तन केला़
आंबे आश्रमशाळेतील विद्यार्थ्याचा मृत्यू
By admin | Published: September 11, 2015 1:04 AM