सटाणा : तालुक्यातील मुल्हेर येथे आपल्या चुलत भावाच्या लग्नाला न गेल्याने कुरापत काढून झालेल्या तुफान हाणामारीत केदारनाथ पवार यांच्या हत्येतील संशयितआरोपी महादू सदा पडाळकर (५५) जोरण ता.बागलाण यांचा आज मालेगांव येथे उपचारासाठी नेत असतांना मृत्यू झाला . यामुळे या घटनेत दोन जणांना जीव गमवावा लागला आहे . तालुक्यातील मुल्हेर येथे शुक्रवारी रात्री साडेदहा वाजेच्या सुमारास चुलत भावाच्या विवाह सोहळ्यास उपस्थित न राहिल्याच्या कारणावरून केदारनाथ पवार यांचे घरावर 11संशयितांनी आरोपींनी हल्ला चढवून झालेल्या तुफान हाणामारीत पवार यांची हत्या झाली होती . या हाणामारीत आरोपी महादू सदा पडळकर यांना देखील गंभीर मारहाण झाल्याने सटाणा येथे उपचार घेत होते . अधिक उपचारासाठी पडळकर यांना मालेगाव येथे हलविण्यात आल्यानंतर त्यांचा देखील मृत्यू झाल्याची माहिती पोलिसांनी दिली आहे .
खून प्रकरणातील संशयिताचा मृत्यू
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: September 07, 2020 6:32 PM
सटाणा : तालुक्यातील मुल्हेर येथे आपल्या चुलत भावाच्या लग्नाला न गेल्याने कुरापत काढून झालेल्या तुफान हाणामारीत केदारनाथ पवार यांच्या हत्येतील संशयितआरोपी महादू सदा पडाळकर (५५) जोरण ता.बागलाण यांचा आज मालेगांव येथे उपचारासाठी नेत असतांना मृत्यू झाला .
ठळक मुद्दे या घटनेत दोन जणांना जीव गमवावा लागला आहे .