शहरं
Join us  
Trending Stories
1
IPL Auction 2025: पहिल्या दिवसात ७२ खेळाडूंची विक्री, पाहा कोण ठरले Top 10 महागडे शिलेदार
2
TATA IPL Auction 2025 Live: ७२ खेळाडूंचं 'शॉपिंग'; ४६७.९५ कोटींची बोली... पहिल्या दिवशी भारतीय खेळाडूंचा बोलबाला
3
"प्रिय बंधु-भगिनींनो... सप्रेम नमस्कार..."! देवेंद्र फडणवीस यांचं जनतेला पत्र; सांगितले विजयाचे 4 'खरे शिल्पकार'
4
IPL Auction 2025 : RR च्या नाकावर टिच्चून MI नं खेळला मोठा डाव; ६२ धावांच्या 'त्या' इनिंगमुळे हा खेळाडू रात्रीत 'करोडपती'
5
IPL Auction 2025: तब्बल ५ तासांनी Mumbai Indians ने विकत घेतला पहिला खेळाडू, १२.५० कोटींना कोण आलं संघात?
6
'ज्यांनी मला त्रास दिला ते सगळे साफ झाले', अशोक चव्हाणांची थोरात-देशमुखांवर बोचरी टीका
7
IPL Auction 2025: मुंबई इंडियन्सने सोडलेला जोफ्रा आर्चर अखेर राजस्थान रॉयल्समध्ये गेला, किती मिळाली किंमत?
8
शिवसेना मुख्यमंत्री पदावर अडीच वर्षासाठी दावा करणार? केसरकर स्पष्टच बोलले...!
9
'तरुण नेतृत्व उभारणार, घरी बसणार नाही', पराभवानंतर शरद पवार नव्या जोमाने कामाला लागले
10
"सर्वेक्षण करा, जी ज्याची जागा असेल त्याला देऊन टाका..."; संभल जामा मशीद प्रकरणावर काय म्हणाले राकेश टिकैत?
11
IPL Auction 2025 : MI नं दिला नाही भाव; Ishan Kishan साठी काव्या मारन यांनी लावली एवढ्या कोटींची बोली
12
IPL Auction 2025 : बिग सरप्राइज! SRK च्या KKR नं रिलीज केलेल्या खेळाडूसाठी मोजली मोठी किंमत, अनेकांच्या भुवया उंचावणारी बोली
13
IPL Auction 2025: 'अनुभवी' अश्विनसाठी दोन जुने संघ भिडले, अखेर CSK ने RR ला दिली मात, कितीला विकत घेतलं?
14
IPL Auction 2025: Gujarat Titans ची शांतीत क्रांती! ३ मॅचविनर खेळाडूंना 'गपचूप' घेतलं ताफ्यात, पाहा कोण?
15
"योगी आदित्यनाथांच्या 'त्या' घोषणेमुळे...";'बटेंगे तो कटेंगे'वर शरद पवारांचे महत्त्वाचे विधान
16
"...त्यामुळे महिलांनी आमच्या विरोधात मतदान केलं"; निकालानंतर शरद पवारांची पहिली प्रतिक्रिया
17
IPL 2025 Auction : १८ कोटींच पॅकेज नाकरणाऱ्या KL Rahul साठी DC नं किती कोटी मोजले ?
18
"EVM बाबत माहिती नाही, पण लोक सांगतात की..."; पराभवानंतर शरद पवारांचे मोठं विधान
19
महायुतीच्या विजयात CM योगींची किती मोठी भूमिका? चंद्रशेखर बावनकुळे म्हणतात...

खाकुर्डीत ढिगाऱ्याखाली दबून दोघांचा मृत्यू

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: March 22, 2019 1:59 AM

मालेगाव तालुक्यातील खाकुर्डी येथे गावाजवळ ग्रामपंचायतीच्या सार्वजनिक विहिरीभोवती मातीचा भराव टाकण्याचे झालेले काम पाहण्यासाठी गेलेले दोन जण मातीच्या ढिगाऱ्यासोबत विहिरीत कोसळल्याने त्यांचा दबून मृत्यू झाला. गुरुवारी बारा वाजेच्या सुमारास ही घटना घडली.

वडनेर : मालेगाव तालुक्यातील खाकुर्डी येथे गावाजवळ ग्रामपंचायतीच्या सार्वजनिक विहिरीभोवती मातीचा भराव टाकण्याचे झालेले काम पाहण्यासाठी गेलेले दोन जण मातीच्या ढिगाऱ्यासोबत विहिरीत कोसळल्याने त्यांचा दबून मृत्यू झाला. गुरुवारी बारा वाजेच्या सुमारास ही घटना घडली.खाकुर्डीत दुपारी सार्वजनिक विहिरीच्या भराव टाकण्याचे काम सुरू होते. विहिरीच्या काठावर उभे राहून काम बघत असताना लगतचा ढिगारा विहिरीत कोसळला. त्यात ते दोघे दबले गेले. त्यांना वाचविण्यासाठी ग्रामस्थांनी एकच गर्दी केली. ग्रामस्थांनी सलग दोन तास राबत दोघांना ढिगाºयातून काढून वाचविण्याचा प्रयत्न केला. परंतु त्यात त्यांना अपयश आले. दीपक कासार (३५) व समाधान जाधव (३२) अशी मृतांची नावे आहेत. या घटनेमुळे परिसरात शोककळा पसरली आहे.सलग दोन तास पोकलँडद्वारे ढिगारा उपसण्याचे काम सुरू होते. घटनास्थळी तसेच अग्निशामक दलाला पाचारण करण्यात आले होते. (पान ५ वर)घटनास्थळी वडनेर खाकुर्डीचे सहाय्यक पोलीस निरीक्षक रामेश्वर मोताळे हजर झाले होते. तहसीलदार रजपूत यांनी घटनास्थळी भेट दिली. मृतांचे शव शवविच्छेदनासाठी मालेगाव सामान्य रूग्णालयात पाठविण्यात आले. दिपक कासारच्या पश्चात एक भाऊ आहे. तर अन्य मृताच्या पश्चात पत्नी, मुलगा व आई असा परिवार आहे. वडनेर खाकुर्डी पोलिसांनी घटनास्थळाचा पंचनामा केला आहे. पोलीस ठाण्यात अकस्मात मृत्यूची नोंद करण्यात आली आहे.सुटीने केला घातधूलिवंदनाची बँकेला तसेच तहसील कार्यालयास सुट्टी असल्याने दोघेही मित्र सणानिमित्त घरीच होते. समाधान जाधव हा वडनेर येथील महाराष्टÑ बँकेचा बँकमित्र म्हणून काम करीत होता.

टॅग्स :MalegaonमालेगांवAccidentअपघातDeathमृत्यू