अंदरसूल : येवला तालुक्यातील अंदरसूल येथील प्राथमिक आरोग्य केंद्रात कुटुंब नियोजन शिबिरात कुटुंब नियोजन शस्रक्रिया केलेल्या खामगाव येथील महिलेचा मृत्यू झाला. डॉक्टरांच्या हलगर्जीपणामुळे सदर महिलेचा मृत्यू झाल्याचा आरोप नातेवाइकांनी केला आहे.या घटनेमुळे रुग्णालय परिसरात तणावाचे वातावरण निर्माण झाल्याने पोलीस बंदोबस्त वाढविण्यात आला आहे. याप्रकरणी येवला तालुका पोलीस ठाण्यात अकस्मात मृत्यूची नोंद करण्यात आली आहे.अंदरसूल येथील प्राथमिक आरोग्य केंद्रात सोमवारी कुटुंब नियोजन शस्रक्रिया शिबिराचे आयोजन करण्यात आले होते. या शिबिरात एकूण १५ रु ग्णांवर कुटुंब नियोजनाची शस्त्रक्रि या करण्यात आली. त्यात येवला तालुक्यातील खामगाव येथील वर्षा अमोल अहिरे यांचाही समावेश होता. सोमवारी सायंकाळी सदर महिलेवर कुटुंब नियोजनाची शस्रक्रिया करण्यात आली. त्यानंतर रात्री दहा ते अकरा वाजेच्या सुमारास महिलेला त्रास होण्यास सुरु वात झाली. (पान ५ वर)तिच्या नातेवाइकांनी ड्यूटीवर असलेल्या सिस्टर डोंगरे यांना याबाबत सांगितले असता डोंगरे यांनी महिलेला इंजेक्शन दिले. मात्र तरीही त्रास कमी झाला नाही. नातेवाइकांनी डॉक्टरांशी संपर्कसाधला मात्र त्याचा उपयोग झाला नाही. रात्री अडीच वाजेच्या सुमारास महिलेचा मृत्यू झाला. या घटनेची माहिती कळताच पोलीस निरीक्षक हिरालाल पाटील घटनास्थळी दाखल झाले. नातेवाइकांनी एकच गोंधळ केल्यामुळे काहीकाळ रुग्णालयात तणाव निर्माण झाला होता. डॉक्टरांच्या हलगर्जीपणामुळे महिलेचा मृत्यू झाल्याचा आरोप नातेवाइकांनी केला आहे. नाशिक येथे शवविच्छेदन केल्यनंतर मयत वर्षा अहिरे यांच्यावर खामगाव येथे अंत्यसंस्कार करण्यात आले.दरम्यान, मंगळवारी दिवसभर रुग्णालय परिसरात कडेकोट पोलीस बंदोबस्त ठेवण्यात आला होता. मनमाड येथील पोलीस उपअधीक्षक श्रीमती रागसुधा यांनी दुपारी घटनास्थळी भेट देऊन आरोग्य केंद्राची पाहणी केली. येवला तालुका पोलीस स्टेशनचे पोलीस निरीक्षक हिरालाल पाटील दिवसभर अंदरसूल येथे तळ ठोकून होते. ज्या डॉक्टरांनी मयत वर्षा अहिरे यांच्यावर शस्त्रक्रिया केली होती ते डॉक्टर हितेंंद्र गायकवाड यांचा दिवसभर संपर्क होऊ शकला नाही.याप्रकरणी येवला तालुका पोलीस ठाण्यात अकस्मात मृत्यूची करण्यात आली आहे. पुढील तपास सहायक पोलीस निरीक्षक कोंडीलवार करत आहेत. मयत वर्षा अहिरे यांना दोन अपत्ये असून, पती अमोल अहिरे हे गवंडी काम करतात.
कुटुंब नियोजन शस्रक्रिया केलेल्या महिलेचा मृत्यू
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: May 15, 2019 1:49 AM
येवला तालुक्यातील अंदरसूल येथील प्राथमिक आरोग्य केंद्रात कुटुंब नियोजन शिबिरात कुटुंब नियोजन शस्रक्रिया केलेल्या खामगाव येथील महिलेचा मृत्यू झाला. डॉक्टरांच्या हलगर्जीपणामुळे सदर महिलेचा मृत्यू झाल्याचा आरोप नातेवाइकांनी केला आहे. या घटनेमुळे रुग्णालय परिसरात तणावाचे वातावरण निर्माण झाल्याने पोलीस बंदोबस्त वाढविण्यात आला आहे.
ठळक मुद्देअंदरसूल येथील घटना