नाशिक : सिन्नर तालुक्यातील वडगाव पान येथे दोन दिवसांपूर्वी राहत्या घरी भाजलेल्या महिलेचा उपचारादरम्यान सोमवारी मृत्यू झाला़ याबाबत अधिक माहिती अशी की, वडगाव पान येथील बावीस वर्षीय विवाहिता वैशाली गणेश पवार ही शनिवारी सायंकाळी राहत्या घरी भाजल्याने पती गणेश रामभाऊ पवार याने उपचारासाठी जिल्हा रुग्णालयात दाखल केले होते़ तिच्यावर जळीत कक्षामध्ये उपचार सुरू होते मात्र ९५ टक्के जळाल्याने सोमवारी दुपारी तिचा मृत्यू झाल्याचे वैद्यकीय अधिकारी डॉ़ गायकवाड यांनी घोषित केले़ या प्रकरणी सिन्नर तालुका पोलीस ठाण्यात अकस्मात मृत्यूची नोंद करण्यात आली आहे़
वडगाव पान येथे भाजलेल्या महिलेचा मृत्यू
By admin | Published: December 09, 2014 1:13 AM