सातपूर : कारखान्यात काम करीत असताना मशीनमध्ये शर्टची बाही अडकून गंभीर जखमी झालेल्या कामगाराचा औषधोपचार चालू असताना नऊ दिवसांनंतर मृत्यू झाल्याची घटना सातपूरला घडली आहे. मधुकर सीताराम राऊतमाळी (३६) असे मृत्यू झालेल्या कामगाराचे नाव आहे. ते कुळबस्त येथील मूळचे रहिवासी असून, सध्या ते शिवाजीनगर येथे राहात होते.याबाबत अधिक माहिती अशी की, सातपूर औद्योगिक वसाहतीतील सिकॉपमधील गाळा क्रमांक २५४ यश प्रिंट या कंपनीत प्रिंटिंग मशीनवर काम करणाऱ्या मधुकर सीताराम राऊतमाळी यांच्या शर्टची बाही मशीनमध्ये अडकू न गेल्या शनिवारी (दि.४) अपघात झाला होता. या अपघातात शर्ट ओढला जाऊन राऊतमाळी यांच्या गळ्याला फास लागल्याने झटका बसून, मानेचे हाड मोडले. याच अवस्थेत त्यांचा पुतण्या हरिदास शिवदास राऊतमाळी याने अन्य सहकाºयांच्या मदतीने त्यांना शासकीय रुग्णालयात उपचारासाठी दाखल केले. या खासगी रुग्णालयात अपघातातील राऊतमाळी यांच्यावर औषधोपचार सुरू असताना शनिवारी (दि.१२) त्यांचा मृत्यू झाला.दरम्यान या घटनेबद्दल सातपूर औद्योगिक वसाहतीमधील कामगार वर्ग तसेच शिवाजीनगर भागातील रहिवाश्यांमध्ये हळहळ व्यक्त होत आहे.
मशीनवरील अपघातात कामगाराचा मृत्यू
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: January 14, 2019 1:24 AM
कारखान्यात काम करीत असताना मशीनमध्ये शर्टची बाही अडकून गंभीर जखमी झालेल्या कामगाराचा औषधोपचार चालू असताना नऊ दिवसांनंतर मृत्यू झाल्याची घटना सातपूरला घडली आहे. मधुकर सीताराम राऊतमाळी (३६) असे मृत्यू झालेल्या कामगाराचे नाव आहे. ते कुळबस्त येथील मूळचे रहिवासी असून, सध्या ते शिवाजीनगर येथे राहात होते.
ठळक मुद्देसातपूर : गळ्याला फास बसल्याने दुर्घटना