नाशिक : रविवार पेठेमधील निमाणी चाळीतील देशमुख यांच्या घरात वीजप्रवाह उतरल्याने संध्याकाळी साडेपाच वाजेच्या सुमारास वीजप्रवाहचा धक्का लागून घराच्या उंबरठ्यावर प्रमिला देशमुख (७७) कोसळल्या. त्यांच्या ओरडण्याचा आवाज ऐकून शेजारी असलेला सनी सावंत या युवकाने त्यांच्या मदतीसाठी धाव घेतली; मात्र त्याला अपयश आले. अत्यवस्थ प्रमिला यांना उचलण्याचा सनीने प्रयत्न केला मात्र त्यालाही वीजप्रवाहचा धक्का बसला व तो जमीनीवर कोसळला. या घटनेत प्रमिला व सनी या दोघांचा मृत्यू झाल्याने निमाणी चाळीवर शोककळा पसरली आहे.
वीजप्रवाहच्या धक्क्याने वृध्देसह युवकाचा नाशिकमध्ये मृत्यू
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: June 07, 2018 9:18 PM
रविवार पेठेमधील अत्यंत जुन्या कौलारु घरांची चाळ म्हणून ओळखल्या जाणाऱ्या निमाणी चाळमधील घर क्रमांक ६१० ब मध्ये राहणा-या प्रमिला देशमुख या संध्याकाळी बाहेर पडत असताना उंबरठ्यावर त्यांना वीजप्रवाहाचा धक्का बसला.
ठळक मुद्देसनी सावंत या युवकाने त्यांच्या मदतीसाठी धाव घेतली.रविवार पेठेमधील अत्यंत जुन्या कौलारु घरांची चाळ वैद्यकिय अधिका-यांनी तपासून मयत घोषित केले