नाशिक : महापालिका आयुक्तांनी मिळकत सर्वेक्षणात नव्याने आढळलेल्या सुमारे ५७ हजार मिळकतींसह मोकळे भूखंड आणि पिवळ्या पट्ट्यातील जमिनींसाठी करयोग्य मूल्य निश्चित करत घरपट्टी वसूल करण्याची कार्यवाही सुरू केली असली तरी मिळकतधारकांकडून मोजणीस विरोध दर्शविला जाऊ लागला आहे. शुक्रवारी (दि.४) पंचवटी विभागात मनपाचे कर्मचारी मोजणीस गेले असता, मिळकतधारकांनी त्यांना जुन्याच दराने आकारणी होणार असेल तरच मोजणी करू देण्याचा पवित्रा घेतला. यावेळी मनपा कर्मचारी व मिळकतधारकांमध्ये वादही झाल्याचे समजते. महापालिका आयुक्तांनी नव्याने निर्माण झालेल्या परंतु ज्यांना अद्याप पूर्णत्वाचा दाखला मिळू न शकलेल्या मिळकतींसह मोकळे भूखंड, पिवळ्या पट्ट्यातील शेतजमीन यांचे करयोग्य मूल्य निश्चित करत करवाढ लागू केली आहे. या करवाढीस तीव्र विरोध दर्शविला जात आहे. करवाढीविरोधात शहरात असंतोष वाढल्याने महापालिकेतील सत्ताधारी भाजपाने महासभेत सदर करवाढीला स्थगिती देण्याचा निर्णय घेतला आणि आचारसंहितेचा भंग केल्याने आयुक्तांविरोधी निवडणूक आयोगाकडे तक्रार करण्याचाही निर्णय घेतला. त्यानुसार महासभेकडून जिल्हा प्रशासनाला तसा ठराव पाठविण्याची तयारी सुरू असतानाच जिल्हाधिकारी तथा निवडणूक अधिकाºयांनी या ठरावामुळे महापौरपद अडचणीत येण्याची शक्यता व्यक्त केल्याने सत्ताधारी भाजपाचे पदाधिकारी बॅकफुटवर आले. आचारसंहितेमुळे करवाढविरोधी वातावरण काहीसे शांत असताना महापालिकेने मात्र, नवीन मिळकतींची मोजणी करण्यास सुरुवात केली आहे. शुक्रवारी (दि.४) मनपाचे कर्मचारी मिळकतींचे मोजमाप घेण्यासाठी गेले असता त्यांना मोजणी करू देण्यास विरोध दर्शविण्यात आला. यावेळी कर्मचाºयांशी हुज्जतही घालण्यात आली. जुन्याच दराने घरपट्टीची आकारणी होत असेल तरच मोजणी करू देण्याचा मिळकतधारकांनी पवित्रा घेतल्याचे समजते.
कर्मचाऱ्यांशी वाद : जुन्याच दराने घरपट्टी आकारणीची मागणी मिळकतधारकांचा मोजणीस विरोध
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: May 06, 2018 12:48 AM
नाशिक : महापालिका आयुक्तांनी मिळकत सर्वेक्षणात नव्याने आढळलेल्या सुमारे ५७ हजार मिळकतींसह मोकळे भूखंड आणि पिवळ्या पट्ट्यातील जमिनींसाठी करयोग्य मूल्य निश्चित करत घरपट्टी वसूल करण्याची कार्यवाही सुरू केली असली तरी मिळकतधारकांकडून मोजणीस विरोध दर्शविला जाऊ लागला आहे.
ठळक मुद्देतरच मोजणी करू देण्याचा पवित्रा घेतलामहापौरपद अडचणीत येण्याची शक्यता