शहरं
Join us  
Trending Stories
1
शिवसेनेला भाजपापासून वेगळं करण्यासाठी 'ते' विधान, मग...; शरद पवारांचा गौप्यस्फोट
2
Maharashtra Election 2024 Live Updates: PM मोदींची स्मरणशक्ती गेलीय, राहुल गांधींचा घणाघात
3
"आम्ही १७० पेक्षा जास्त जागा जिंकणार", विधानसभा निवडणुकीबाबत डीके शिवकुमार यांचे विधान
4
Zomato, Jio Financial निफ्टी ५० मध्ये येऊ शकतात; BPCL, Eicher Motors बाहेर जाणार?  
5
Uddhav Thackeray : "गद्दारांना मतदारच जागा दाखवणार, तुरुंगात कांदे सोलायला पाठवू"; उद्धव ठाकरे कडाडले
6
छत्तीसगडमध्ये नक्षलवाद्यांविरोधात मोठी कारवाई, सुरक्षा दलांशी झालेल्या चकमकीत ५ जण ठार
7
माधुरी दीक्षितला सलमान खान-संजय दत्तसोबत 'साजन' सिनेमा न करण्याचा मिळाला होता सल्ला, अभिनेत्रीनं सांगितलं कारण
8
पर्थ टेस्टसाठी शास्त्रींनी निवडली बेस्ट संभाव्य प्लेइंग इलेव्हन; सर्फराजपेक्षा KL राहुल भारी?
9
फडणवीसांनी 'व्होट जिहाद'वरून चढवला हल्ला; शरद पवारांनी दिलं प्रत्युत्तर; म्हणाले...
10
"ही भाषा...", अजित पवार यांच्या 'वाली' वक्तव्यावर सुप्रिया सुळे स्पष्टच बोलल्या; PM मोदी, अमित शाह यांचंही नाव घेतलं!
11
भामरागडमध्ये पर्लकोटा नदीजवळ स्फोट, पोलिसांकडून सर्च ऑपरेशन
12
भाजपाला मत देणाऱ्या मुस्लिमांना शोधून काढा, अन्...; महाविकास आघाडीवर गंभीर आरोप
13
'अबीर गुलाल'नंतर नुकतीच सुरु झालेली कलर्स मराठीवरील नवी मालिका होणार बंद? चाहत्यांना धक्का
14
महायुतीचे उमेदवार विलास भुमरे गॅलरीतून पडले, हात-पाय फ्रॅक्चर, उपचार सुरु
15
Meta चा Video, लोकेशनसह अलर्ट; पोलिसांनी १२ मिनिटांत ९ किमी जाऊन वाचवला तरुणाचा जीव
16
Sunita Williams : सुनीता विल्यम्सच्या अडचणी वाढल्या, आंतरराष्ट्रीय अंतराळ स्थानकात तडे, अनेक ठिकाणाहून गळती
17
जेफरीजनं 'या' ५ Stock वर सुरू केलं कव्हरेज, दिला खरेदीचा सल्ला; HAL, PNB सारख्या दिग्गजांचा समावेश
18
खळबळजनक! सलमान खानवर गोळीबार केल्यानंतर लॉरेन्स बिश्नोई गँगने केलेला 'हा' प्लॅन
19
Astrology: शनिदोष टाळण्यासाठी सगळ्याच राशीच्या लोकांनी आवर्जून 'अशी' घ्या काळजी!
20
मनसे उमेदवाराला पाहताच कट्टर शिवसैनिकाच्या पत्नीला अश्रू अनावर; वरळीत काय घडलं?

कर्जमाफी, भरपाईसाठी सरकारची भेट घेऊ :  शरद पवार

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: November 02, 2019 2:01 AM

परतीच्या पावसामुळे शेतकऱ्यांचे दुहेरी नुकसान झाले आहे, एकतर कर्ज काढून पीक घेतले आणि आता उभे असलेले पीक पूर्ण वाया गेले आहे, त्यामुळे सरकारने शेतकऱ्यांनी पिके घेण्यासाठी घेतलेले कर्ज माफ करावे व झालेल्या पिकांची नुकसानभरपाई द्यावी, अशी मागणी आपण सरकारकडे करू अशी ग्वाही शरद पवार यांनी दिली.

नाशिक : परतीच्या पावसामुळे शेतकऱ्यांचे दुहेरी नुकसान झाले आहे, एकतर कर्ज काढून पीक घेतले आणि आता उभे असलेले पीक पूर्ण वाया गेले आहे, त्यामुळे सरकारने शेतकऱ्यांनी पिके घेण्यासाठी घेतलेले कर्ज माफ करावे व झालेल्या पिकांची नुकसानभरपाई द्यावी, अशी मागणी आपण सरकारकडे करू अशी ग्वाही शरद पवार यांनी दिली. वणी-कळवण रस्त्यावर शेतकºयांच्या नुकसानीची पाहणी पवार यांनी केली. त्यावेळी शेतकºयांशी संवाद साधताना ते बोलत होते.बाळू गांगोडे या शेतकºयाने सोयाबीनचे उद्ध्वस्त झालेले पीक भरल्या डोळ्याने पवार यांना दाखविताच उपस्थितांचे मन हेलावले. बाजरीच्या कणसांना फुटलेले कोंब, काळ्या पडलेल्या सोयाबीनच्या शेंगा, मणी गळून पडलेले द्राक्ष पाहून पवार यांनी उपस्थित शेतकºयांशी संवाद साधत तालुका कृषी अधिकारी व तहसीलदार यांची साक्ष काढली. यावेळी शेतकºयांनी आपल्या साºया व्यथा कथन करताना जिल्हा बँक व राष्ट्रीयीकृत बँका शेतकºयांना पीक कर्ज देत नाहीत, उलट बँकांनी सक्तीची वसुली सुरू केल्याचे सांगून सहकार निबंधकांकरवी बजावलेल्या नोटिसा पवार यांना दाखविल्या. ज्या शेतकºयांना कर्ज माफीचा लाभ मिळाला व त्यांची नावे यादीत आली अशा शेतकºयांना बँका नवीन कर्ज देण्यास दारापुढे उभे करीत नसल्याचे सांगितले. तर पंचनामे करण्यासाठी आलेले तलाठी ३० टक्क्यांपेक्षा शेतकºयांच्या पिकांचे कमी नुकसान झाल्याचे पंचनामे करीत असल्याची तक्रार केली.यावेळी पवार यांनी तालुका कृषी अधिकाºयांकडून कळवण तालुक्यातील माहिती घेतली. गेल्या दोन दिवसात पंधरा टक्के पंचनामे झाल्याचे त्यांनी सांगितले, येत्या आठवड्यात पंचनामे पूर्ण झाले की त्याचा अहवालात पाठवण्यात येईल अशी माहिती त्यांनी दिली. त्यावर झालेले नुकसान खूपच आहे, आम्ही सरकारकडे ते मांडू पण तुम्हाला काय अपेक्षित आहे अशी विचारणा पवार यांनी केली. त्यावर शेतकºयांनी पिकांचे झालेले सर्व नुकसान मिळावे, कर्ज माफी व्हावी अशी मागणी केली. त्यावर कोणत्या पिकांना किती भरपाई मिळेल अशी विचारणा पवार यांनी करताच, तहसीलदारांना त्याची माहिती असल्याचे दिसून आले नाही. त्यांनी राष्टÑीय आपत्ती व्यवस्थापन कायद्यानुसार दोन वर्षांपूर्वी केंद्र सरकारने निश्चित केलेल्या दरानुसार नुकसानभरपाई मिळणार असल्याचे सांगितले. जवळपास अर्धातास पवार यांनी शेतकºयांचे म्हणणे ऐकून घेतल्यानंतर शेतकºयांच्या झालेल्या नुकसानीचे पंचनामे झाल्यावर ते सर्व एकत्रित करून व गावनिहाय, पीकनिहाय किती नुकसान झाले त्याची माहिती गोळा करून जिल्ह्णातील राष्टÑवादीचे सर्व आमदार माझ्या उपस्थितीत राज्य सरकारच्या प्रमुखाला भेटतील व सारी परिस्थिती त्यांच्या कानावर घातली जाईल. सरकारने या गंभीर परिस्थतीत शेतकºयांच्या प्रश्नाकडे सहानुभूतीने पाहून मदतीसाठी निर्णय घ्यावा. ते घेतील अशी अपेक्षा आहे, नाही घेतली तर पुढे काय करायचे त्याबाबतची भूमिका आपण घेऊ, ती भूमिका काय असेल हे सांगायची येथे वेळ नसल्याचेही पवार म्हणाले. यावेळी आमदार नितीन पवार, नरहरी झिरवाळ, माणिकराव कोकाटे, सरोज अहिरे, देवीदास पिंगळे, समीर भुजबळ, कोंडाजी आव्हाड, रवींद्र पगार, जयश्री पवार आदी उपस्थित होते.सरसकट पंचनामे करण्याची पवार यांची मागणीजिल्ह्यातील शेतकºयांच्या सर्वच पिकांचे नुकसान झाले असून, या पिकांसाठी शेतकºयांनी कर्ज घेतले, ते पीकही आता वाया गेले आहे. संपूर्ण एक वर्ष वाया गेले आहे. लाखो रुपयांची गुंतवणूक शेतकºयांना त्यासाठी करावी लागली. संकट मोठे असले तरी, त्यातून मार्ग काढावा लागणार आहे. त्यासाठी राज्य व केंंद्र सरकारकडे प्रयत्न करावे लागतील. त्यासाठी शेतकºयांची कर्ज माफी कशी करता येईल याचा सरकारने विचार करावा.२ज्या बॅँकांनी शेतकºयांना पीक कर्ज देणे बंद केले अशा बॅँकांनी शेतकºयांना कर्ज देण्याची भूमिका घ्यावी, शेतकºयांच्या नुकसानीचे सरसकट पंचनामे करावे व त्यांना एकरी पीक नुकसानीची भरपाई द्यावी हाच शेतकºयांना मोठा आधार होऊ शकतो, असे शरद पवार यांनी पिंगळवाडे येथे शेतकºयांशी संवाद साधताना सांगितले.बारा तासांत  साडेतीनशे  किलोमीटर प्रवासजिल्ह्णात परतीच्या पावसाने गेल्या आठवड्यापासून झोडपून काढल्याने शेतपिकांचे प्रचंड नुकसान झाले आहे. त्याची पाहणी करण्यासाठी शुक्रवारी शरद पवार यांनी इगतपुरी ते थेट बागलाण असा सुमारे बारा तासांत साडेतीनशे किलोमीटरचा प्रवास केला.च्सकाळी साडेदहा वाजता पवार यांनी घोटी नजीकच्या टाके येथे भेट दिली त्यानंतर रायगडनगर व नाशिक येथे त्यांचे आगमन झाले. दुपारी दीड वाजेनंतर पवार यांनी थेट दिंडोरी तालुक्यातील खेडगाव, वणी येथे भेट देऊन शेतकºयांशी संवाद साधला.च्कळवण तालुक्यातील पांडाणेनजीक शेतात भेट दिली. तेथून कळवण मार्गे खामखेडा, डांगसौंदाणे रस्त्याने थेट सटाणा गाठले. वीरगावमार्गे पवार यांनी सायंकाळी सात वाजता पिंगळवाडे, मुंगसे या गावांना भेटी देऊन पाहणी केली. रात्री दहा वाजता त्यांचे नाशकात आगमन झाले.द्राक्ष उत्पादकांना रडू कोसळले; मंत्रालयासमोर आत्मदहनाचा इशारापवार यांनी आपल्या दौºयात बागलाण तालुक्यातील पिंगळवाडे गावाला भेट दिली. हंगामपूर्व द्राक्ष घेणाºया या गावात सुमारे तीन लाख हेक्टरपेक्षा अधिक क्षेत्रावर शेतकºयांनी हंगामपूर्व द्राक्ष घेतले आहेत; परंतु परतीच्या पावसामुळे शेतकºयांचे ७० ते ९० टक्के पीक वाया गेले. पवार यांनी भर पावसात केदा दावल भामरे यांच्या शेतात भेट दिली. त्यानंतर तेथे जमलेल्या शेकडो शेतकºयांशी संवाद साधला. केदा भामरे यांनी २० एकरवर द्राक्षबाग घेतली असून, त्यांचे पंधरा कोटी रुपयांचे नुकसान झाले आहे. आपली भावना व्यक्त करताना त्यांना रडू कोसळले व ते काहीच बोलू शकले नाही तर किशोर खैरनार या तरुण शेतकºयाने रडतच आपल्या भावना व्यक्त केल्या. सुमारे आठ एकरवर द्राक्ष बाग घेतली असून, बॅँकेचे ५० लाख रुपयांचे कर्ज डोक्यावर असल्याचे सांगितले.बॅँकेचे अधिकारी दररोज घरी येतात, आईच्या गळ्यातील डोरलेदेखील गहाण ठेवण्यात आले असून, सरकारने द्राक्ष उत्पादकांना दिलासा देण्यासाठी येत्या पंधरा दिवसांत निर्णय घ्यावा अन्यथा मंत्रालयासमोर आत्मदहन करण्याचा इशारा खैरनार यांनी दिला. अशाच प्रकारच्या भावना दिलीप बनकर, दीपिका चव्हाण, रामचंद्र बापू पाटील, अशोक गायकवाड यांनीही व्यक्त केल्या.

टॅग्स :FarmerशेतकरीSharad Pawarशरद पवारagricultureशेती