नाशिक : शहरातील गोदावरी नदीपात्रातील रामकुंडावर मराठा क्र ती मोर्चाच्या कार्यकर्त्यांनी शनिवारी (दि.२१) मराठा आरक्षणासह समाजाच्या अन्य मागण्यांसाठी भाजपा सरकारसह मराठा समाजाच्या आमदारांसोबतच, नेत्यांचा दशक्रियाविधी करून मुंडण केले. मराठा समाजाने राज्यभरातून ५७ मूक मोर्चे काढल्यानंतर गेल्यावर्षी ९ आॅगस्टला मुंबईत महामोर्चा क ाढून सरकारसमोर मराठा आरक्षणासह समाजाच्या विविध मागण्या मांडल्या होत्या. परंतु, सरकारने समाजाच्या मागण्या गांभीर्याने घेतल्या नसून मराठा समाजाचे आमदारांनीही समाजाच्या मागण्यासाठी गांभीर्याने पाठपुरावा केला नाही, असा आरोप सकल मराठा क्रांती मोर्चातर्फे करण्यात आला असून, मोर्चाच्या काही कार्यकर्त्यांनी शनिवारी रामकुंडावर सरकार व समाजाच्या आमदारांचा दशक्रिया विधी क रतानाच स्वत:चे मुंडण करून घेत सरकारविरोधात तीव्र निषेध व्यक्त केला आहे. मराठा क्रांती मोर्चातर्फे परळी येथे ठिय्या आंदोलन सुरू करण्यात आल्यानंतर पुन्हा एकदा मराठा आरक्षणासाठी समाज रस्त्यावर उतरू लागला असून, नाशिकमधून हजारो कार्यकर्ते मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांना महापूजा आणि महाआरती करण्यापासून रोखण्यासाठी पंढरपूरला रवाना झाले आहेत. संपूर्ण राज्यभरात मराठा समाज आक्रमक झालेला असून, राज्यातील प्रत्येक जिल्ह्यातून हजारोंच्या संख्येने मराठा क्रांती मोर्चाचे कार्यकर्ते पंढरपूरच्या दिशेने मार्गस्थ होत असतानाही शासनाने कुठलीही समाजाच्या मागण्याची दखल घेतलेली नाही.सरकारचा निषेधमराठा समाजाच्या मागण्यांविषयी भाजपा सरकार गंभीर नसल्याचा आरोपही मराठा क्रांती मोर्चाकडून करण्यात येत आहे. दरम्यान, मराठा समाज्याच्या मागण्यांसाठी मराठा क्रांती मोर्चाचे शांततेच्या मार्गाने सुरू असलेले आंदोलन यापुढेही सुरू राहणार असून, याच आंदोलनाचा भाग म्हणून सरकारच्या निषेधार्थ नाशिक रामकुंडावर मराठा क्र ांती मोर्चाच्या कार्यकर्त्यांनी सरकार व आमदारांच्या नावाने दशक्रि या विधी करून मुंडण करून सरकारचा निषेध केला. तसेच यापुढे आणखी आक्रमक भूमिका घेण्याचे स्पष्ट करण्यात आले.
गोदावरी नदीपात्रातील रामकुंडावर सरकारचा ‘दशक्रिया विधी’
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: July 22, 2018 12:32 AM