लोहोणेर : सतत पडण्याऱ्या जोरदार पावसामुळे शिवनाल्याला पाणी आल्याने सदर नाल्यात पाण्याच्या प्रवाहाने सुमारे पाच फूट खोली निर्माण झाल्याने गेल्या आठवड्यापासून बंद असलेला भऊर-विठेवाडी जवळचा ४०० मिटरचा शिवरस्ता अखेर या परिसरातील शेतकऱ्यांनी स्वखर्चाने लोकवर्गणीतून दुरु स्ती करण्याचा निर्णय घेतला आहे.सदर शिव रस्ता हा या नाल्याला मोठ्या प्रमाणात पाणी आल्याने वाहुन गेला होता. यामुळे भऊर-विठेवाडी दरम्यान असलेल्या या शिवारातील २००-३०० शेतकºयाच्या संपर्क तुटला असुन शेतकरी व महीलाचा वापर बंद पडला आहे. शेतातील तयार असलेल्या बाजरी, मका, कांदा, काद्यंचि रोपे, पपई आदी पिकांचे नुकसान झाले आहे.सदरचा शिवरस्ता हा अतिशय उपयुक्त असुन विडेवाडी सावकी दरम्यान असलेल्या बिटीश कालिन बंधारा असुन विठेवाडी येथिल सार्वजनिक पाणी पुरवटा योजना सदर बंधांर्या लगत असुन गावाला पाणी पुरवठा करणेसाठी विद्युतपंप सुरू करणेसाठी सुमारे दीड किलो मीटर पायी जावे लागते या संदर्भात लोकप्रतिनिधीना निवेदन देण्यात आली आहेत.सदर रस्ता दुरु स्ती बाबत देवळा तहसीलदार दत्तात्रेय शेजुळ यांना निवेदन देण्यात आले आहे. सदर रस्ता दुरुस्त करावा अशी मागणी निवेदनाद्वारे भऊर येथील शेतकरी नानाजी पवार, जीभाऊ पवार, फुला जाधव, मोठाभाऊ जाधव, दिनकर जाधव, अमर जाधव, प्रविण जाधव, यशवंत जाधव, प्रभाकर पवार, नंदु पवार, योगेश पवार, कडु पवार, सावकार गरुड, हेमंत पवार, गोरख पवार, शाम पवार, भास्कर पवार, कैलास पवार, पंडीत पवार, परशराम पवार आदींनी केली आहे.
भऊर-विठेवाडी जवळचा शिवरस्ता लोकवर्गणीतून दुरु स्तीचा निर्णय
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: November 04, 2019 11:12 PM
लोहोणेर : सतत पडण्याऱ्या जोरदार पावसामुळे शिवनाल्याला पाणी आल्याने सदर नाल्यात पाण्याच्या प्रवाहाने सुमारे पाच फूट खोली निर्माण झाल्याने गेल्या आठवड्यापासून बंद असलेला भऊर-विठेवाडी जवळचा ४०० मिटरचा शिवरस्ता अखेर या परिसरातील शेतकऱ्यांनी स्वखर्चाने लोकवर्गणीतून दुरु स्ती करण्याचा निर्णय घेतला आहे.
ठळक मुद्देलोहोणेर : आठवड्यापासून बंद असलेला मार्ग अखोर होणार चालू