ठळक मुद्दे सर्व व्यवसाय बंद ठेवण्यात येणार
वणी : कोरोनाचा प्रादुर्भाव होऊ नये व विषाणुचा संसर्ग टाळण्यासाठी वणी शहरातील अत्यावश्यक सेवा वगळता बुधवार दि.२९ जुलै ते शनिवार दि. १ आॅगस्टपर्यंत सर्व व्यवसाय बंद ठेवाण्याचे आदेश ग्रामपालीकेने काढले आहे.दुध संकलन केन्द्र, मेडीकल स्टोअर, हॉस्पीटल व पिठाच्या गिरण्या, रासायनिक खते व बि-बियाणे आदी अत्यावयक व्यवसाय या कालावधीत सुरु राहणार असुन उर्वरीत सर्व व्यवसाय बंद ठेवण्यात येणार आहे.