शहरं
Join us  
Trending Stories
1
विक्रमी वर्ष! दक्षिण आफ्रिके विरुद्ध मालिका जिंकत टीम इंडियानं रचला इतिहास
2
संघ मुख्यालयाच्या अवतीभोवती घरोघरी प्रचारावर भर; मध्य नागपूर मतदारसंघात दटके-शेळके लढतीत पुणेकरांमुळे रंगत
3
"तुम्हाला आत टाकणार"; आदित्य ठाकरेंचा सदा सरवणकरांना भरसभेत इशारा
4
आधी २ 'बदक' आता 'पदक' मिळवणारी सेंच्युरी! संजूनं मोडला KL राहुलचा रेकॉर्ड
5
"शरद पवार फॅक्टर आहेत आणि राहतील, कारण..."; देवेंद्र फडणवीसांचं मोठं विधान
6
रितिका-रोहित दुसऱ्यांदा झाले आई-बाबा! बेबी बॉयच्या स्वागतासाठी Junior Hit-Man चा ट्रेंड
7
संजू सॅमसन अन् तिलक वर्मा दोघांची शतकं; टीम इंडियाच्या जोडीनं रचला खास विक्रम
8
IND vs SA : सर्वोच्च धावसंख्या, सर्वाधिक षटकार अन् दोन शतकवीर; मॅचमधील ५ रेकॉर्ड्स 
9
दिल्लीत पुन्हा ड्रग्सची मोठी खेप जप्त; आंतरराष्ट्रीय बाजारात तब्बल 900 कोटी रुपये किंमत
10
आरे देवा! संजूनं चौकार-षटाकारानं डोळ्याचं पारणं फेडलं, पण तिच्यावर आली रडण्याची वेळ!
11
"लोकं आम्हाला सोडून गेले अन् आता सांगतात की..."; शरद पवारांचा हसन मुश्रीफांवर हल्लाबोल
12
भयानक...! धनत्रयोदशीला नवी कोरी इनोव्हा घेतलेली, अपघातात सहा तरुण मित्रमैत्रिणींचा जीव गेला
13
पॉवर प्लेमध्ये Sanju Samson अन् Abhishek Sharma नं दाखवली 'पॉवर'; पण...
14
मोठी बातमी! राज ठाकरेंनी विश्वास टाकला, उमेदवारी दिली, पण त्यानेच ठाकरे गटात प्रवेश केला
15
लुटणाऱ्याचे पैसे घ्या, पण मनसेला मतदान करा; उल्हासनगरच्या सभेत राज ठाकरेंचे वक्तव्य 
16
IND vs SA 4th T20I : अखेर सूर्यकुमार यादवनं टॉस जिंकला, मालिका जिंकण्यासाठी सेट करणार टार्गेट
17
"घुसखोरांसह काँग्रेसलाही बांगलादेशात पाठवायला हवे..."; असं का म्हणाले हिमंता बिस्वा सरमा?
18
अजित पवार, अशोक चव्हाणांचा 'बटेंगे तो कटेंगे'ला विरोध; फडणवीस म्हणाले, "त्यांना समजवून..."
19
विजय शिवतारेंच्या पराभवासाठी अनेकजण देव पाण्यात बुडवून बसलेत; एकनाथ शिंदेंची अजितदादांच्या उमेदवाराविरोधात सभा
20
महायुती सत्तेत आली, तर मुख्यमंत्री कोण होणार? एकनाथ शिंदे अन् अजित दादांचं नाव घेत जयंत पाटलांची भविष्यवाणी!

गुरुवारी उमेदवारांच्या भाग्याचा फैसला ; दुपारपर्यंत निकाल

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: October 23, 2019 5:14 PM

अत्यंत चुरशीच्या व काही मतदारसंघांत अती-तटीच्या झालेल्या विधानसभा निवडणुकीसाठी सोमवारी जिल्ह्यातील पंधराही विधानसभा मतदारसंघांत मतदान घेण्यात आले. एकूण ४५ लाख ४४ हजार ६४१ मतदारांपैकी २८ लाख १७ हजार ९९७ मतदारांनी या निवडणुकीत आपला मतदानाचा हक्क बजावल्याने जिल्ह्यात सरासरी ६२.१ टक्के मतदानाची नोंद

ठळक मुद्दे पहिली फेरी जाहीर करण्यासाठी ४० मिनिटे लागतीलमतमोजणीची तयारी पूर्ण : विजयी मिरवणुकांवर निर्बंध

लोकमत न्युज नेटवर्कनाशिक : संपूर्ण जिल्ह्याचे लक्ष लागून असलेल्या जिल्ह्यातील पंधराही विधानसभा मतदारसंघांतून उमेदवारी करीत असलेल्या १४८ उमेदवारांच्या भाग्याचा फैसला गुरुवारी होणार असून, सकाळी आठ वाजेपासून सर्वच मतदारसंघांमध्ये मतमोजणीस सुरुवात केली जाणार आहे. त्यासाठी प्रशासकीय तयारी पूर्ण झाली आहे. दुपारी बारा वाजेनंतर निकाल हाती येण्यास सुरुवात होणार असले तरी कायदा व सुव्यवस्था अबाधित ठेवण्यासाठी विजयी उमेदवारांच्या मिरवणुकांवर पोलिसांनी निर्बंध लादले आहेत.

अत्यंत चुरशीच्या व काही मतदारसंघांत अती-तटीच्या झालेल्या विधानसभा निवडणुकीसाठी सोमवारी जिल्ह्यातील पंधराही विधानसभा मतदारसंघांत मतदान घेण्यात आले. एकूण ४५ लाख ४४ हजार ६४१ मतदारांपैकी २८ लाख १७ हजार ९९७ मतदारांनी या निवडणुकीत आपला मतदानाचा हक्क बजावल्याने जिल्ह्यात सरासरी ६२.१ टक्के मतदानाची नोंद करण्यात आली. मतदानाचा टक्का वाढावा यासाठी शासकीय पातळीवर प्रयत्न करण्याबरोबरच राजकीय पक्षांनीही निवडणूक प्रचाराच्या निमित्ताने घरोघरी जाऊन मतदारांना मतदानासाठी आवाहन केले होते. तरीदेखील २०१४च्या तुलनेत दोन टक्क्याने मतदान घटले. या निवडणुकीचे वैशिष्ट्ये म्हणजे २००९ प्रमाणेच यंदा कॉँग्रेस आघाडी व महायुती अशी सरळसरळ लढत झाली. काही मतदारसंघांमध्ये महाराष्टÑ नवनिर्माण सेना, बहुजन वंचित आघाडीबरोबरच काही अपक्षांनीही निवडणुकीत रंगत आणली होती. त्यामुळे कुठे दुरंगी तर कुठे तिरंगी व बहुरंगी लढती झाल्यामुळे निवडणुकीत मोठी चुरस पहावयास मिळाली. त्याचबरोबर निवडणूक प्रचारातील आरोप-प्रत्यारोपांच्या फैरींमुळे मतदारांचे चांगलेच मनोरंजन झाले होते. सर्वच उमेदवार व त्यांच्या समर्थकांनी रात्रीचा दिवस करून प्रचारात स्वत:ला झोकून देत मतदानानंतर आपणच विजयी होऊ, असा दावा केला असला तरी त्याचा फैसला गुरुवारी होणार आहे.गुरुवारी सकाळी आठ वाजता प्रत्येक मतदारसंघाच्या मुख्यालयी निवडणूक निर्णय अधिकारी व निवडणूक निरीक्षकांच्या उपस्थितीत मतमोजणीस सुरुवात करण्यात येणार असून, प्रारंभी निवडणुकीच्या कामात नेमलेल्या कर्मचारी, अधिकाऱ्यांनी केलेल्या टपाली मतपत्रिकांची मोजणी केली जाईल. त्यानंतर निवडणूक निरीक्षक व उमेदवारांच्या प्रतिनिधींसमक्ष स्ट्रॉँगरूमचे सील काढण्यात येऊन मतपेट्या मोजणीसाठी प्रत्येक टेबलावर देण्यात येईल. साधारणत: पहिली फेरी जाहीर करण्यासाठी ४० मिनिटे लागतील, त्यानंतर मात्र प्रत्येक फेरीसाठी २० मिनिटे लागतील. दुपारी बारा वाजेपर्यंत सर्वच उमेदवारांचा कल जाहीर होणार असून, आघाडी, पिछाडी पाहून उमेदवार दिवाळीपूर्वी फटाके फोडण्यास मोकळे होतील.

टॅग्स :ElectionनिवडणूकMaharashtra Assembly Election 2019महाराष्ट्र विधानसभा निवडणूक 2019Nashikनाशिक