खर्डे येथे कोरोनाच्या पार्श्वभूमीवर बंद असलेले दुकाने.
लोकमत न्यूज नेटवर्कखर्डे : देवळा तालुक्यातील खर्डे गावात कोरोनाचा वाढता प्रादुर्भाव रोखण्यासाठी पाच दिवसांचा स्वयंस्फूर्तीने जनता कर्फ्यू पाळण्यात येत आहे. अत्यावश्यक सेवावगळता कडकडीत बंद पाळण्यात आला आहे. देवळा शहरात कोरोनाबाधित २० रुग्ण आढळून आल्याने ग्रामीण भागातील नागरिकांनी या महामारीचा संसर्ग टाळण्यासाठी गावे स्वयंस्फूर्तीने बंद ठेवण्याचा निर्णय घेतला आहे. नागरिकांनी विनाकारण घराच्या बाहेर पडू नये, मास्कचा वापर करावा, शारीरिक अंतर राखावे जो नियमांचे पालन करणार नाही त्यांच्याकडून दंड वसूल करण्याचा इशारा ग्रामपालिका प्रशासनाने दिला आहे.निफाड तालुक्यात पंधरा नवीन रुग्णनिफाड तालुक्यातील पिंपळगाव नजीक येथील चार, ओझर सहा, निफाड चार तर चाटोरी येथील एक असे पंधरा नवीन संक्रमित रुग्णाचे अहवाल आले आहेत, अशी माहिती निफाड तालुका वैद्यकीय अधिकारी डॉ. चेतन काळे यांनी दिली.लासलगाव येथील कोरोना उपचार केंद्र सध्या २७ रुग्णांमुळे क्षमतेपेक्षा जास्त रुग्णांनी फुल्ल झाले असून, या केंद्राचे प्रमुख डॉ. राजाराम शेंद्रे यांच्यासह डॉ. बाळकृष्ण अहिरे व कर्मचारी यांच्या उत्कृष्ट सेवे व उपचारामुळे लहान तीन वर्षांचे बालकासहआतापर्यंत ५७ बरे झालेल्या रुग्णांना निरोप देण्यात आलेला आहे.तालुका वैद्यकीय अधिकारी डॉ. चेतन काळे यांच्या मार्गदर्शनाखाली तालुक्यातील वैद्यकीय अधिकारी निमगाववाकडा प्राथमिक आरोग्य केंद्राचे वैद्यकीय अधिकारी डॉ. साहेबराव गावले अहोरात्र आपला जीव धोक्यात घालून सेवा देत आहेत.तरीही रुग्णसंख्या गतीने वाढत आहे. पिंपळगावनजीक येथील चार, ओझर सहा, निफाड येथील दोन तर चाटोरी येथील एक असे तेरा नव्याने कोरोना पॉझिटिव्ह रुग्णांचे अहवाल आलेले आहेत, अशी माहिती निफाड तालुका वैद्यकीय अधिकारी डॉ. चेतन काळे यांनी दिली आहे.
सटाणा शहरात आणखी तीन बाधितसटाणा : शहरात कोरोनाचा प्रादुर्भाव वाढत असून, शनिवारी (दि. ४) पुन्हा दोन महिलांसह तिघे कोरोनाबाधित असल्याचे उघडकीस आले आहे. शहरात सर्वच नियम धाब्यावर बसवून प्रचंड प्रमाणात गर्दी वाढत असताना रु ग्णसंख्येतही वाढ होत असल्याने चिंतेचे वातावरण पसरले आहे. शहरात कोरोनाचा फैलाव रोखण्यासाठी जिल्हाधिकाऱ्यांनी नाशिकच्या धर्तीवर बाजारपेठेत सम-विषम नियम लागू करण्याचे आदेश दिले आहेत. असे असताना सरार्सपणे नियम धाब्यावर बसवून गर्दी केली जात आहे .त्यामुळे पाच दिवसातच शहरातील बाधितांची संख्या दहावर गेली आहे. शनिवारी (दि. ४) दुपारी आलेल्या वैद्यकीय अहवालात शहरातील मध्यवस्तीतील काळ-ूनानाजी नगरमध्ये एका ४५ वर्षीय महिला व ५२ वर्षीय पुरु ष असे दाम्पत्य कोरोनाबाधित असल्याचे निष्पन्न झाले तर मटण मार्केटसमोर एक ६० वर्षीय महिलादेखील बाधित आढळली आहे.