सिन्नर : भोजापूर धरणातून रब्बी हंगामासाठी १२० दशलक्ष घनफूट पाणी सोडण्यात येणार आहे. येत्या २८ नोव्हेंबर रोजी सिन्नर व संगमनेर तालुक्यातल्या लाभक्षेत्रातील गावांना आवर्तन देण्यात येणार आहे. कालवा सल्लागार समितीच्या बैठकीत निर्णय घेण्यात आला.आमदार राजाभाऊ वाजे यांच्या अध्यक्षतेखाली झालेल्या बैठकीस पाटबंधारे विभागाचे कार्यकारी अभियंता राजेंद्र शिंदे, जिल्हा परिषद सदस्य नीलेश केदार, उपअभियंता एस. एस. गोंदकर, शाखा अभियंता बी. डब्ल्यू बोडके, बी. के. अचाट, दीपक बर्के यांच्यासह मान्यवर व्यासपीठावर उपस्थितीत होते.आवर्तनात अडथळे आणणे, कालव्याचे नुकसान करणे, फोडणे आदी प्रकार करणाºयांवर गुन्हे दाखल करणार आहे. कुणालाही फोन न करता थेट गुन्हे दाखल करण्याचा निर्णय बैठकीत घेण्यात आला. यापूर्वीच्या प्रकरणांची चौकशी करण्याची मागणी यावेळी शेतकºयांनी केली. कालवा व चाºया दुरु स्तीची कामे पाच दिवसात पूर्ण करण्याच्या सूचना आमदार वाजे यांनी केल्या. त्यानंतरच रब्बीचे आवर्तन सोडावे, असा निर्णय घेण्यात आला. दुरुस्तीला वेळ लागल्यास आवर्तनही एक ते दोन दिवस पुढे ढकलण्याची शक्यताही यावेळी व्यक्त करण्यात आली.धरणात पाणी कमी असल्याने उपलब्ध पाण्याचे काटेकोर नियोजन करावे. पाटबंधारे विभागाचे अधिकारी, पाणी वापर संस्थांनी ते यशस्वी करावे व लाभार्थ्यांना पुरेसा फायदा होईल यादृष्टीने लक्ष देण्याच्या सूचना आमदार राजाभाऊ वाजे यांनी केल्या. आवर्तनाद्वारे पिण्याच्या पाण्याची व विशेषत: जनावरांच्या पाण्याची सोय होईल यादृष्टीने काळजी घेण्याचे आवाहन त्यांनी केले. नियोजन यशस्वीतेसाठी गतवर्षीपेक्षाही जास्त कर्मचाºयांची उपलब्धता करुन कालव्यावर जादा कर्मचारी नेमावीत, अशाही सूचना आमदार वाजे यांनी अधिकाºयांना केल्या. धरणातून सोडण्यात येणार्या पाण्याचे दर दोन तासांनी वाचन करण्याची मागणीही शेतकºयांनी केली. शेतकºयांनी जागेवर पाणी मागणी केल्यास अशांनाही लगेचच पाणी देण्याची मागणी बैठकीत मान्य करण्यात आली.यावेळी नांदूरशिंगोटेचे सरपंच गोपाल शेळके, उपसरपंच शरद शेळके, संगमनेर तालुक्यातील हरिश्चंद्र चकोर, बी. आर. चकोर, पाणी वापर संस्थांचे श्याम उगले, भागवत घुगे, कारभारी शिंदे, पाराजी शिंदे, आर. पी. आव्हाड, विष्णू पुणेकर, पाराजी शिंदे, दशरध आव्हाड, सुरेश शेळके, कृष्णाजी आव्हाड आदी उपस्थित होते.फोटो क्र.- 23२्रल्लस्रँ09फोटो ओळी-
भोजापूर धरणातून रब्बीसाठी आवर्तन सोडण्याचा निर्णय
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: November 23, 2018 6:28 PM