शहरं
Join us  
Trending Stories
1
दिल्लीला मिळाल्या तिसऱ्या महिला मुख्यमंत्री! आतिशी यांच्यासह आणखी ५ मंत्र्यांनी घेतली शपथ
2
काँग्रेस नेते राजभवनावर, घेतली राज्यपाल राधाकृष्णन यांची भेट; पण नेमके कारण काय?
3
जिंकलंस मित्रा! वकील बनून लढला स्वत:च्या किडनॅपिंगची केस, १७ वर्षांनंतर ८ गुन्हेगारांना शिक्षा
4
ENG vs AUS : WHAT A BALL! स्टीव्ह स्मिथ 'क्लिन बोल्ड', ऑस्ट्रेलियन दिग्गजाचाही विश्वास बसेना
5
"म्यानमारमधून ९०० कुकी अतिरेकी मणिपूरमध्ये घुसले", सुरक्षा सल्लागारांनी दिला दुजोरा, चिंता वाढली
6
58 कर्मचाऱ्यांशी शारीरिक संबंध अन्...! कोण आहे चीनची ही 'सुंदर गव्हर्नर'? ठोठावण्यात आली 13 वर्षांची शिक्षा
7
“ज्याच्या जास्त जागा त्याचा मुख्यमंत्री हे सूत्र मविआत नाही”; संजय राऊत स्पष्टच बोलले
8
हवाई दल प्रमुखपदी एअर मार्शल अमरप्रीत सिंग यांची नियुक्ती; जाणून घ्या, त्यांच्याविषयी...
9
"या तीन घराण्यांनी जम्मू-काश्मीरमध्ये दहशत पसरवली" अमित शाहांचा विरोधकांवर हल्लाबोल
10
भारतात WANTED असलेला फरार इस्लामिक धर्मगुरू झाकिर नाईक पाकिस्तानात 'पाहुणा'
11
IND vs BAN, 1st Test Day 3 Stumps : वेळेआधी थांबला खेळ; ढगाळ वातावरणातही चित्र एकदम स्पष्ट
12
तिरुमला तिरुपती लाडू वाद: प्रकाश राज यांचा DCM पवन कल्याण यांना मोलाचा सल्ला; म्हणाले...
13
बाबो! इन्स्टावर सूत जुळलं, एकमेकांवर प्रेम जडलं; पंक्चरवाल्यासाठी नवऱ्याला सोडलं अन्...
14
लेडीज टॉयलेटमध्ये कॅमेरा लावला; मुलीने रंगेहाथ पकडला, विद्यार्थ्याला अटक, अनेक व्हिडीओ सापडले
15
ऐश्वर्या-करीश्मादेखील वाचवू शकले नाहीत सुपरस्टारच्या मुलाचं करिअर, आता इंडस्ट्रीतून आहे गायब
16
मोठी बातमी: विधानसभेसाठी वंचितचा धमाका; ११ उमेदवारांची पहिली यादी जाहीर
17
शेतकऱ्यांसाठी आनंदाची बातमी; विहिरी, शेततळे, वीज जोडणीसाठीच्या अनुदानात वाढ
18
TV वर खूप नाव कमावलं पण मोठ्या पडद्यावर चालली नाही जादू; प्रसिद्ध अभिनेत्याला ओळखलं का?
19
काय सांगता! ६०० ब्राह्मण करतात तिरुपतीचा प्रसाद; १ लाख लाडू रामलला चरणी केले होते अर्पण
20
IND vs BAN : डोळ्याची पापणी लवण्याच्या आत खेळ खल्लास! यशस्वीनं घेतलेला भन्नाट कॅच बघाच (VIDEO)

महापौरांच्या जामिनावर आज निर्णय

By admin | Published: February 03, 2015 12:45 AM

माळवी अद्याप रुग्णालयातच : अटक लांबविण्याच्या हालचाली !

कोल्हापूर : लाचप्रकरणी जाळ््यात अडकलेल्या महापौर तृप्ती माळवी अद्याप रुग्णालयातच आहेत. त्यांच्या अटकपूर्व जामीन अर्जावर आज, मंगळवारी निर्णय होणार आहे. दरम्यान, कोल्हापूरची तसेच पदाची बदनामी टाळण्यासाठी राजीनामा मंजूर झाल्यानंतरच त्यांना अटक केली जावी, यासाठी जोरदार हालचाली सुरुआहेत. असे असले तरी जामीन अर्जावर काय निर्णय होतो, यावर त्यांची अटक अवलंबून आहे. महापौर म्हणून ‘लाचलुचपत’च्या जाळ््यात सापडणाऱ्या त्या राज्यातील पहिल्या आणि आतापर्यंतच्या एकमेव महापौर आहेत. या प्रकरणाने त्यांची स्वत:ची, महापौर म्हणून त्या पदाची, राष्ट्रवादीची व कोल्हापूरच्या म्हणून या शहराची बेअब्रू झाली. महापालिकेतील ढपला संस्कृतीबद्दल आजपर्यंत अनेकवेळा उघड चर्चा झाली. परंतु, थेट महापौरच लाच प्रकरणात सापडल्यानंतर त्यावर शिक्कामोर्तबच झाले. आता सगळ््यांचीच अब्रू गेली आहे. परंतु यापुढे किमान त्या या पदावर असताना तरी त्यांना अटक होऊ नये, असे प्रयत्न राष्ट्रवादी काँग्रेसच्या पातळीवर सुरू आहेत. पक्षाने राजीनामा घेतला तरी जोपर्यंत महापालिका सभेत त्यांचा रितसर राजीनामा मंजूर होत नाही, तोपर्यंत तांत्रिकदृष्ट्या त्याच महापौर असतील.महापालिकेने संपादित करून न वापर केलेली जागा परत द्यावी, यासाठी १६ हजारांची लाच घेताना माळवी यांना ३० जानेवारीला सायंकाळी लाचलुचपत प्रतिबंधक विभागाने पकडले. राष्ट्रवादी काँग्रेसने लगेच दुसऱ्याच दिवशी त्यांचा रुग्णालयात जाऊन राजीनामा घेतला. उच्च रक्तदाबाचा त्रास होत असल्याचे कारण दाखवून त्या रुग्णालयात दाखल झाल्या आहेत. त्यांचा राजीनामा मंजूर करण्यासाठी महापालिकेची सर्वसाधारण सभा ९ फेब्रुवारीस होत आहे. त्यामुळे त्यास अजून आठवड्याचा अवधी आहे. महापालिकेची विशेष सभा बोलविताना किमान सात दिवसांची मुदत द्यावी लागते. कायद्यानेच ते बंधनकारक आहे. त्यामुळे तो कालावधी कमी करताच येत नाही. महापौरांचे आजारपणाचे कारणही तेवढे दिवस चालू शकणार नाही, अशी सद्यस्थिती आहे. त्यामुळे आज (मंगळवार)त्यांच्या जामीनावर निर्णय होताच त्यांना सकाळीच अटक होण्याची शक्यता जास्त ठळक झाली आहे.महापौरांचा राजीनामा घेतल्याने विशेष सभेला पीठासन अधिकारी कोण ही चर्चा सुरू झाली आहे. परंतु महापालिका कायद्यात त्यासंबंधीचीही तरतूद आहे. ‘चेअरमन आॅफ दि मिटींग’प्रमाणे मेअर आॅफ दि मिटींगची निवड करता येते. त्यासाठी दोघा सदस्यांनी ठराव दिल्यास एखाद्या ज्येष्ठ सदस्यास पीठासन म्हणून नियुक्त करून सभेचे कामकाज करता येते.हकालपट्टीबाबत आज निर्णय : तटकरेतृप्ती माळवी यांचा पक्षाने तातडीने राजीनामा घेतला तरी त्यांना पक्षातून निलंबित अथवा काढून टाकलेले नाही. त्यासंबंधीचा अहवाल शहराध्यक्ष आर. के. पोवार यांनी प्रदेशाध्यक्ष सुनील तटकरे यांना दिला आहे. आज, मंगळवारी मुंबईत होणाऱ्या पक्ष नेत्यांच्या बैठकीत त्यासंबंधीचा निर्णय घेतला जाईल, असे प्रदेशाध्यक्ष सुनील तटकरे यांनी स्पष्ट केले.