ठळक मुद्देया कालावधीत फक्त वैद्यकीय सेवा व औषध दुकाने सुरू असणार
अभोणा : शहरात कोरोनाचा फैलाव रोखण्यासाठी अभोणा ग्रामपालिका प्रशासनासह व्यापारी बांधवांनी मंगळवार दि. ३० मार्च ते ५ एप्रिलपर्यंत संपूर्ण शहरात जनता कर्फ्यू पाळण्याचा निर्णय घेतला आहे.
या कालावधीत फक्त वैद्यकीय सेवा व औषध दुकाने सुरू असणार असून, अन्य सर्व व्यावसायिक प्रतिष्ठाने पूर्णतः बंद ठेवण्यात येणार असल्याची माहिती ग्रामविकास अधिकारी जिभाऊ जाधव यांनी दिली आहे.