नाशिक : जिल्ह्यातील सहा नगरपंचायतींसाठी दोन टप्प्यात झालेल्या निवडणुकांची मतमोजणी बुधवारी (दि.१९) होत असून, अवघ्या जिल्ह्याचे लक्ष या निकालांकडे लागले आहे. कळवण, पेठ व देवळ्यात सत्ता कायम राहण्याची, तर सुरगाणा, निफाड व दिंडोरीत सत्तांतर होण्याची शक्यता वर्तविली जात आहे.कळवण : येथील नगरपंचायतच्या पहिल्या निवडणुकीत स्पष्ट बहुमत कोणत्याही राजकीय पक्षाला मिळाले नव्हते, मात्र यंदा राष्ट्रवादीला स्पष्ट बहुमत मिळण्याचा अंदाज आहे. गेल्यावेळी राष्ट्रवादी काँग्रेस ७, भाजप ४, काँग्रेस ३, शिवसेना १ तर अपक्षांनी २ जागांवर विजय मिळविला होता. राष्ट्रवादी काँग्रेसचे आमदार नितीन पवार, गटनेते कौतिक पगार यांनी राष्ट्रवादी, काँग्रेस, शिवसेना, अपक्ष असा महाविकास आघाडीचा पहिला प्रयोग कळवणमध्ये करून पाच वर्षे सत्ता टिकवून शहरातील रस्त्याचा चेहरामोहरा बदलून टाकला. शहरात १०० कोटी रुपयांची विकासकामे केली, त्यात शहरासाठी २५ कोटी रुपयांची पाणीपुरवठा योजना मंजूर केली. १७ प्रभागात रस्ते, पाणी, गटार, पथदीप आदी विकासकामांना प्राधान्य दिले. प्रभाग क्र. ७ मधून राष्ट्रवादीच्या प्रथम नगराध्यक्षा सुनीता पगार बिनविरोध झाल्या. प्रभाग क्र. ११ मधून भाजपने माघार नोंदवल्यामुळे राष्ट्रवादीच्या हर्षदा पगार बिनविरोध झाल्या. प्रभाग क्र. १२ मधून चिठ्ठीचा कौल काँग्रेसच्या तेजस पगार यांच्या बाजूने पडल्यामुळे ते बिनविरोध झाले. विकासकामांच्या जोरावर आघाडीने पुन्हा कळवणकरांकडे कौल मागितला असून, तीन जागा बिनविरोध झाल्यामुळे आघाडीने सत्तेकडे कूच केली आहे. आघाडीकडे सत्ता देण्याचा कळवणकरांचा एकंदरीत कौल आहे.पक्षांतराचे वारेकाँग्रेसच्या रोहिणी महाले यांनी शिवसेनेत प्रवेश करून प्रभाग ६ मधून उमेदवारी केली, तर राष्ट्रवादीच्या तेजस जाधव यांनी प्रभाग ३ मधून भाजपची उमेदवारी केली.सुरगाण्यात त्रिशंकू स्थितीनगरपंचात निवडणुकीचा निकाल बुधवारी (दि.१९) लागणार असल्याने मातब्बर उमेदवारांमध्ये हुरहूर लागली असून, काय निकाल येतो याची उत्सुकता शहरासह तालुक्यात लागली आहे. यावेळच्या निवडणुकीत बहुमत कुणाएका पक्षाला मिळणार नाही, असा अंदाज आहे. भाजप, शिवसेना व माकपाचे उमेदवार कमी अधिक फरकाने निवडून येण्याची शक्यता आहे. राष्ट्रवादी एका जागेवर विजय प्राप्त करेल, असा कयास आहे. गेल्या निवडणुकीत भाजपने सात जागांवर विजय मिळविला होता. तीच पुनरावृत्ती भाजप यंदाही करेल असाही अंदाज वर्तविला जात आहे.
सहा नगरपंचायतींत आज होणार फैसला
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: January 19, 2022 12:17 AM
नाशिक : जिल्ह्यातील सहा नगरपंचायतींसाठी दोन टप्प्यात झालेल्या निवडणुकांची मतमोजणी बुधवारी (दि.१९) होत असून, अवघ्या जिल्ह्याचे लक्ष या निकालांकडे लागले आहे. कळवण, पेठ व देवळ्यात सत्ता कायम राहण्याची, तर सुरगाणा, निफाड व दिंडोरीत सत्तांतर होण्याची शक्यता वर्तविली जात आहे.
ठळक मुद्देकळवण, पेठ, देवळ्यात सत्ता कायम राहण्याची, तर सुरगाणा, निफाडसह दिंडोरीत सत्तांतराची शक्यता