सातपूर : सीआयआयच्या एसआयडीएम उपक्रमांतर्गत भारतीय संरक्षण विभागाच्या समवेत १७ जानेवारी रोजी एचएएल येथे डिफेन्स इनोवेशन हब सुरू करण्याची प्रक्रिया राबविण्यात येणार असल्याची माहिती डॉ. प्रशांत पाटील यांनी निमात आयोजित बैठकीत दिली.या संदर्भात एचएएल येथे देशातील विविध २० उद्योगांच्या माध्यमातून सुट्या भागांचे प्रदर्शनही आयोजित करण्यात आले असल्याचे डॉ. प्रशांत पाटील यांनी सांगितले.या बैठकीत डायनामिकचे पी.नागेंद्र प्रसाद, गोवा शिपयार्डचे जॉर्ज सॅम्युएल, आर्मी ले. कर्नल सुजित भोसले, बीईएमएलचे नीलेश थोरात, डीजीएक्यूएचे संचालक अनिल अभ्यंकर, मिधानीचे राकेश पुट्टीयान, एमडीएल मुंबईचे अजित अमित नबीरा, जीआरएसईचे जी. पी. पांडे, डिफेन्सचे मीनल भोसले, एमआयडीएमचे यशवर्धन वर्मा, सीआयआयचे मनीष विसपुते, एचएएलचे अजित अभ्यंकर, एम. पी. सिंग, एन. बी. सहारे आदींसह निमा अध्यक्ष हरिशंकर बॅनर्जी, शशिकांत जाधव, तुषार चव्हाण, प्रदीप पेशकार, कैलास आहेर, सुधाकर देशमुख उपस्थित होते.याबाबत संरक्षण विभागाशी संलग्न वरिष्ठ अधिकाऱ्यांनी निमा हाऊस येथे बैठक घेऊन दि.१७ रोजी एचएएल येथे संरक्षण राज्यमंत्री डॉ. सुभाष भामरे यांच्या उपस्थितीत घोषणा केली जाणार आहे.
डिफेन्स इनोवेशन हबची घोषणा १७ रोजी
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: January 10, 2019 11:23 PM
सीआयआयच्या एसआयडीएम उपक्रमांतर्गत भारतीय संरक्षण विभागाच्या समवेत १७ जानेवारी रोजी एचएएल येथे डिफेन्स इनोवेशन हब सुरू करण्याची प्रक्रिया राबविण्यात येणार असल्याची माहिती डॉ. प्रशांत पाटील यांनी निमात आयोजित बैठकीत दिली. या संदर्भात एचएएल येथे देशातील विविध २० उद्योगांच्या माध्यमातून सुट्या भागांचे प्रदर्शनही आयोजित करण्यात आले असल्याचे डॉ. प्रशांत पाटील यांनी सांगितले.
ठळक मुद्देएचएएल : संरक्षण विभाग-सीआयआय यांचा संयुक्त उपक्रम