येथील उर्दू मीडिया सेंटरमध्ये बुधवारी (दि.१) जनता दलाचे मुस्तकिम डिग्नीटी, डॉ. खलील अन्सारी, रशीद येवलेवाले व पदाधिकाऱ्यांनी पत्रकार परिषद घेवून महापालिका निवडणुकीबाबत जनता दलाची भूमिका स्पष्ट केली. यावेळी मुस्तकिम डिग्नीटी म्हणाले की, शहरात मोठ्या संख्येने मुस्लीम समाज आहे. शहराला अल्पसंख्यांक जिल्हा म्हणून घोषित करावा. शेजारील धुळ्याला आदिवासी जिल्ह्याचा दर्जा देण्यात आला आहे. याच धर्तीवर शासनाने जिल्हा निर्मिती करावी. शासनाकडून कायमच मालेगाव शहराबाबत भेदभाव केला जात आहे. सामान्य रूग्णालय उभारले असले तरी याला जिल्ह्याचा दर्जा नसल्याने पुरेशी आरोग्य सेवा मिळत नाहीत. शहरातील रस्ते, गटारींची वाट लागली आहे. सत्ताधारी कॉंग्रेस पक्षाने केवळ स्वत:चा विकास केला आहे. महापालिका निवडणुकीपूर्वी जनता दलाच्या प्रमुख नेत्याची निवड केली जाणार आहे. यासाठी कमिटी गठीत करण्यात आली असून कमिटीचे पदाधिकारी शहरातील कार्यकर्ते व नागरिकांशी संवाद साधत आहेत.
इन्फो
उद्या पदाधिकाऱ्यांची निवड
येत्या ३ सप्टेंबरला पक्षाच्या प्रमुखाची निवड केली जाणार आहे. यानंतर जिल्हा निर्मिती व शहर विकासासाठी मालेगाव विकास मंच स्थापन केला जाणार असून या मंचाच्या माध्यमातून सर्वसामान्य जनतेचे प्रश्न सोडविणार असल्याचे डिग्नीटी यांनी सांगितले. पत्रकार परिषदेला पदाधिकारी उपस्थित होते.
फोटो फाईल नेम : ०१ एमएसईपी ०५ . जेपीजी
फोटो कॅप्शन : मालेगाव येथील उर्दू मिडिया सेंटरमध्ये झालेल्या पत्रकार परिषदेत जनता दलाची भूमिका स्पष्ट करताना मुस्तकिम डिग्नीटी, डॉ. खलील अन्सारी, रशीद येवलेवाले व पदाधिकारी आदि.
010921\01nsk_45_01092021_13.jpg
फोटो कॅप्शन बातमी सोबत दिले आहे.