सप्ताहात गहू, बाजरी, हरभरा, सोयाबीन, मका यांच्या आवकेत घट झाली. स्थानिक व्यापारी वर्गाची व देशांतर्गत भुसार धान्याला मागणी सर्वसाधारण राहिल्याने गहू, बाजरी, हरभरा यांचे बाजारभाव स्थिर असल्याचे दिसून आले. सोयाबीन बाजारभाव मात्र तेजीत, तर मक्याच्या बाजारभावात वाढ झाल्याचे दिसून आले.
सप्ताहात गव्हाची आवक २० क्विंटल झाली असून बाजारभाव किमान रु. १६३६ ते कमाल रु. १७१२, तर सरासरी रु. १६९१ पर्यंत होते. सप्ताहात बाजरीची आवक ५९ क्विंटल झाली असून, बाजारभाव किमान रु. १५०० ते कमाल रु. १५५१, तर सरासरी रु.१५२२ पर्यंत होते. हरभऱ्याची आवक ११ क्विंटल झाली असून बाजारभाव किमान रु. ३३३३ ते कमाल रु.४५९९, तर सरासरी रु. ४१५१ पर्यंत होते.
सोयाबीनची आवक १४ क्विंटल झाली असून, बाजारभाव किमान रु. ४५०० ते कमाल रु.७७००, तर सरासरी रु. ७३९१ पर्यंत होते. मक्याची आवक ३३ क्विंटल झाली असून, बाजारभाव किमान रु. १७०० ते कमाल रु. १८३३, तर सरासरी रु. १८१६ प्रतिक्विंटलपर्यंत होते.