देवळाली कॅम्प : माध्यमिक शाळांमध्ये विद्यार्थ्यांच्या क्रीडा तासिका कमी करण्याचा शासन निर्णय मुलांच्या आरोग्यावर विपरीत परिणाम करणारा असून, शासनाने यासंदर्भात काढलेले परिपत्रक रद्द करावे, अशी मागणी शिवसेनेच्या वतीने देवळाली हायस्कूलच्या व्यवस्थापनास दिलेल्या निवेदनात केली आहे. राज्य शासनाने क्रीडा तासिका चारवरून दोन तास केल्याने विद्यार्थ्यांना क्रीडा सरावास कमी वेळ मिळत आहे. याबाबत शिवसेनेच्या शिष्टमंडळाने शाळेचे मुख्य कार्यकारी अधिकारी गोवर्धनदास मनवानी व मुख्याध्यापक हेमंत मोजाड यांना देण्यात आलेल्या निवेदनात म्हटले आहे की, क्रीडा तासिका कमी केल्याने विद्यार्थ्यांना क्रीडा क्षेत्रापासून वंचित ठेवण्याचा चुकीचा निर्णय घेतला आहे. यावेळी शाळेचे अधिकारी मनवानी व मुख्याध्यापक मोजाड यांनी विद्यार्थ्यांना खेळाच्या सरावासाठी अधिक तासिका उपलब्ध करून देण्याचे आश्वासन दिले. निवेदनावर छावणी परिषदेचे माजी उपाध्यक्ष दिनकर पाळदे, छावणीेचे बाबूराव मोजाड, हनुमंता देवकर, शहरप्रमुख साहेबराव चौधरी, प्रवीण पाळदे, प्रमोद मोजाड, वैभव पाळदे, मनपा नगरसेवक केशव पोरजे आदिंच्या सह्या आहेत.विद्यार्थी वर्गास उलट क्रीडा प्रकारांचे महत्त्व पटवून देत खेळांमध्ये रस घेण्यास प्रवृत्त करण्याची गरज आहे. खेळामुळे आरोग्य सुधारते. क्रीडा क्षेत्रासाठी शासनाने सकारात्मक धोरण व कलानैपुण्य मिळविल्यास नोकºयांमध्ये प्राधान्य मिळते, असे असताना विद्यार्थ्यांना खेळाच्या तासांपासून वंचित ठेवणे बरोबर नाही. शाळेने क्रीडा तासिका वाढवाव्यात अन्यथा आंदोलन छेडले जाईल, असा इशारा निवेदनात दिला आहे.
तासिका कमी करण्याचा निर्णय रद्दची मागणी
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: October 01, 2017 12:25 AM