नाशिक : जिल्ह्यात सोमवारी (दि. २४) नवीन ६७७ कोरोनाबाधित आढळले असून, एकूण १३४९ रुग्ण कोरोनामुक्त झाले आहेत. बाधितांच्या तुलनेत कोरोनामुक्त झालेल्यांची संख्या दुप्पट असली तरी जिल्ह्यात ४३ जणांचा बळी गेल्याने आतापर्यंतच्या एकूण बळींची संख्या ४४१४ वर पोहोचली आहे.जिल्ह्यात कोरोनामुक्त नागरिकांची संख्या अधिक राहात आहे. त्यामुळेच सोमवारी उपचारार्थी रुग्णांची संख्या १५,२४४ वर पोहोचली आहे. नाशिक मनपा क्षेत्रामध्ये ३१६, तर नाशिक ग्रामीणला ३५० आणि मालेगाव मनपा क्षेत्रात ११ रुग्ण बाधित आहेत. नाशिक मनपा क्षेत्रात २१, ग्रामीणला १७ आणि मालेगाव मनपात ५ असा एकूण ४३ जणांचा बळी गेला आहे. कोरोनामुक्तचे प्रमाण ९५ टक्क्यानजीक जिल्ह्यात कोरोनामुक्त रुग्णांच्या संख्येत थोडी वाढ होऊन ते प्रमाण ९४.८३ टक्क्यावर पाेहाेचले आहे. त्यात जिल्हाबाह्य रुग्णांचा दर ९८.०५ टक्के, नाशिक शहर ९६.६३, नाशिक ग्रामीण ९२.४१, तर मालेगाव मनपाचा कोरोनामुक्तीचा दर ८९.०३ टक्क्यांवर पाेहोचला आहे.प्रलंबित अहवालात घट प्रलंबित अहवालांची संख्या घटून २३७५ वर आली आहे. जिल्ह्यातील रुग्णसंख्या घटू लागल्याने आता दोन दिवसांतच अहवाल मिळू लागले आहेत.
नवीन रुग्णसंख्येत घट; जिल्ह्यातील बळी मात्र ४३
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: May 25, 2021 2:26 AM