गेल्या वर्षी कोरोनाचे संकट शहरावर आल्यानंतर जूनपासून बाधितांची संख्या वाढत गेली. सप्टेंबर महिन्यात शहरात बाधितांची संख्या पन्नास हजारांचा टप्पा पार करून गेली. त्यामुळे चिंतेचे वातावरण निर्माण झाले. त्यानंतर, ऑक्टोबरमध्ये रुग्णसंख्या कमी होण्यास सुरुवात झाली आणि बरे हेाण्याचे प्रमाणही वाढत गेले. हे प्रमाण डिसेंबरपर्यंत रिकव्हरी रेट म्हणजेच बरे होण्याचे प्रमाण ९५ टक्क्यांवर गेले, तर जानेवारीत ९७.७२ टक्के इतके रुग्ण बरे होण्याचे प्रमाण होते. नंतर मात्र, फेब्रुवारी महिन्यात रुग्णसंख्या वाढत गेली आणि मार्च महिन्यात रुग्णसंख्या वाढत गेली. मार्च महिन्यात संख्या उच्चांकी झाली आहे. मात्र, रिकव्हरी रेट कमी होत गेला आणि आता तर हे प्रमाण तर ८५.४४ टक्के इतके झाले आहेत. त्यामुळे शहरात चिंतेचे वातावरण आहे.
शहरात रुग्णांच्या बरे होण्याच्या प्रमाणात घट
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: March 30, 2021 4:11 AM