निफाड : कोरोना रोगाच्या प्रसारामुळे जगातील सर्व देशांना आर्थिक फटका बसलेला असताना गावगाडा चालवणाऱ्या संस्थांना कोरोनामुळे आर्थिक चटके बसले आहेत. मार्च महिन्यात लॉकडाऊन असल्याने निफाड नगरपंचायतीच्या विविध कररूपाने मिळणाºया वसुलीत घट झाल्याने मागील वर्षीच्या तुलनेत उत्पन्न कमी मिळाले असल्याने शहरातील विकासकामे करताना अडथळे निर्माण होतात की काय, अशी शक्यता निर्माण झाली आहे.मार्च हा विविध करवसुलीचा महिना असतो. नेमका याचदरम्यान कोरोना संसर्गजन्य रोगाचा प्रसार झाला आणि लॉकडाऊनमुळे निफाड शहर बराच काळ बंद असल्याने सर्व दैनंदिन व्यवहार ठप्प होते.नागरिकांचा उत्पनाचा स्रोत थांबल्याने कर भरणे अवघड होऊन बसले आणि निफाड नगरपंचायतीच्या करवसुलीला ब्रेक लागला. आर्थिक बाजू कमकुवत झाल्याने नगरपंचायतीची चिंता वाढली आहे. निफाड शहराची लोकसंख्या २१ हजार आहे.--------------------निफाड नगरपंचायत स्थापन झाल्यानंतर शहरात विकासकामे सुरू असताना कोरोनामुळे लॉकडाऊन असल्याने गेल्या चार महिन्यांत नगरपंचायतीच्या आर्थिक उत्पन्नावर परिणामझाला आहे.करवसुली थांबल्यामुळे नगरपंचायत फंडात येणाºया निधीवर परिणाम झाला आहे. त्यामुळे हा मासिक खर्च कसा भागवायचा, असा प्रश्न नगरपंचायत प्रशासनासमोर उभा राहिला आहे. गेल्या वर्षी १४ व्या वित्त आयोगांतर्गत १ कोटी ४७ लाख रु पये आले होते. यावर्षी १५ व्या वित्त आयोगात अवघे ३२ लाख ९५ हजार रु पये प्राप्त झाल्याने विकासकामे करताना दमछाक होणार आहे.--------------------निफाड शहराला पिण्याच्या पाण्याची टंचाई भासतनसल्याने टँकर किंवा तत्सम सोय करण्याची गरज भासत नाही. मात्र पिण्याच्या पाण्याचे शुद्धीकरण करणे, पाणी पुरवठा करणे.मेंटेनन्स, दिवाबत्ती, पाणीपुरवठा विभागातर्फे पाणी उचलणे याची वीजदेयके ३ लाख रु पये तसेच स्वच्छता व पाणीपुरवठा कर्मचारी या स्थायी आस्थापनेस ६ लाख रु पये खर्च महिन्याला होत असतो.निफाड शहरातील यावर्षी ४४ टक्के घरपट्टी व ३४ टक्के पाणीपट्टी वसुली झाली आहे. मार्च आणि एप्रिल या महिन्यात वसुली असते मात्र नेमके याचदरम्यान कोरोनासंकट आल्याने ६० टक्के वसुलीचे उद्दिष्ट थांबले आहे.---------------------------निफाड नगरपंचायतीची करवसुली व इतर वसुली कमी झाली आहे. नगरपंचायत किती टक्के करवसुली करते यावर शासन अनुदान पाठवत असते त्यामुळे विकासकामे करताना अडथळे येणार आहेत. नगरपंचायतीला मिळणाºया करवसुलीतून शहरातील पाणीपुरवठ्याची बिले, पाणीपुरवठ्याचा मेंटेनन्स, शहरातील स्ट्रीट लाइटची वीजबिले, आरोग्यविषयक सुविधांचा खर्च, कर्मचारी वेतनाचा तसेच कोरोनासंदर्भात शहरात केल्या गेलेल्या उपाययोजना आदींवर खर्च करावा लागतो. त्यामुळे यापुढे करवसुलीसाठी नागरिकांचे सहकार्य अपेक्षित आहे.- एकनाथ तळवाडे, नगराध्यक्षमागील वर्षाच्या वसुलीचा विचार केला तर नगरपंचायतीची मालमत्ता व कर संरक्षण यात ५० लाख रुपयांची घट झाली आहे. तसेच दैनंदिन व आठवडे बाजार करवसुलीत २ लाख रु पयांची घट झाली आहे. दाखला फी, हस्तांतरण शुल्क, बांधकाम मंजुरी, शुल्क नक्कल फी यातून मिळणारे ५० हजार रु पयांच्या अनुदानाचे नुकसान झाले आहे. तसेच जमीन महसूल कर, मुद्रांक, गौण खनिज यातून मिळणारे १० लाख रु पयांचे अनुदान प्राप्त झाले नाही. आर्थिक वसुली कमी जरी झाली तरी शहरातील नागरिक केंद्रबिंदू मानून पाणीपुरवठा, स्वच्छता दैनंदिन गरजा पूर्ण करण्यासाठी निफाड नगरपंचायत प्रशासन कटिबद्ध आहे.- पंकज गोसावी, मुख्य अधिकारी
वसुलीतील घट ठरणार विकासकामात अडसर!
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: June 16, 2020 8:56 PM