शहरं
Join us  
Trending Stories
1
Maharashtra Election 2024: शेवटचा ‘मास्टर स्ट्रोक’! ‘सुपर संडे’साठी काँग्रेस अन् भाजप नेत्यांचा विदर्भात तळ
2
प्रचाराच्या आसमंतात हेलिकॉप्टरची भिरभिर; निवडणुकीच्या हंगामात होणार ५५० कोटींची उलाढाल
3
तोंडातून उसळे शब्दांचे हे बाण, वेडात प्रचारी वीर दौडले सात...
4
महाराष्ट्रातील आठ लाख नोकऱ्या गुजरातला गेल्या; प्रियांका गांधींचा महायुतीवर हल्ला
5
भारत-चीनमधील तणाव कमी होणे आवश्यक; परराष्ट्रमंत्री एस. जयशंकर यांचे मत
6
...म्हणूनच ‘बटेंगे तो कटेंगे’ची घोषणा; केंद्रीय मंत्री पीयूष गोयल यांची भूमिका
7
बहिणींना पैसे देताय, पण त्यांच्या सुरक्षेचे काय?, शरद पवार यांचा सरकारला सवाल
8
एक तरी आयकॉनिक प्रोजेक्ट दाखवा; देवेंद्र फडणवीस यांचे ठाकरेंना आव्हान
9
अमेरिकेतील सरकारी नोकऱ्यांमध्ये होणार कपात, रामास्वामींकडून संकेत
10
काँग्रेसने प्रसिद्ध केला मुंबईकरांसाठी स्वतंत्र जाहीरनामा; हाउसिंग सोसायट्यांना ६ महिन्यांत देणार ओसी
11
मतांच्या ढिगाऱ्यात चंगू, मंगू बुडाले पाहिजे; मुख्यमंत्री शिंदे यांची राऊत बंधूंवर टीका
12
मुंबईत तब्बल आठ हजार किलो चांदीचे घबाड केले जप्त; निवडणूक आयोगाची कारवाई
13
"लोकसभेत गुडघ्यावर आणले, आता महायुतीस पाताळात गाडणार"; उद्धव ठाकरेंचा इशारा
14
"मला हलक्यात घेतलं, त्याचे परिणाम आता दिसतायत"; मुख्यमंत्री एकनाथ शिंदेंचा राऊतांना इशारा
15
"केंद्र बिंदूच्या बुडाला आग लावायची वेळ आली"; उद्धव ठाकरेंचा ठाण्यातून महायुतीवर घणाघात
16
भविष्यात दोन ठाकरे एकत्र येऊ शकतात का? मनसेसोबत युती होऊ शकते का...? उद्धव ठाकरे म्हणाले...
17
...म्हणून उद्धव ठाकरे यांनी थेट फोनद्वारे घेतली सभा; "नाराज होवू नका एकत्र येवून..."
18
२०१४ ला भाजपाला त्यांची खरी ताकद कळली, अन् त्यानंतर वाढतच गेली!.. जाणून घ्या काय घडलं?
19
"साईबाबांच्या आशीर्वादामुळे उद्धव ठाकरे मुख्यमंत्री झाले, अन्यथा..."; दीपक केसरकरांचा पलटवार
20
Maharashtra Vidhan Sabha Election 2024 :'महाराष्ट्रात पैशाच्या जोरावर सरकार चोरले, तुम्ही संविधानाच्या गोष्टी करता'; प्रियांका गांधींचा हल्लाबोल

नाशिकमध्ये तलावात विसर्जनाला नकार

By श्याम बागुल | Published: September 13, 2018 5:51 PM

गावाच्या तलावातील पाण्याची साठवण क्षमता ३० दशलक्ष घनफूट इतकी आहे, त्यामुळे तलावातील गणपती विसर्जन केल्यामुळे मोठ्या प्रमाणात प्रदूषण निर्माण होऊ शकते, तसेच तलावातील पाण्याच्या खोलीचा अंदाज येत नसल्यामुळे

ठळक मुद्देप्रदूषण टळेल : अनुचित घटनांना आळा बसेलभाविकांना आपला जीव गमवावा लागला आहे.

नाशिक : गावाला पाणीपुरवठा करणाऱ्या पाझर तलावातील पाणी दूषित होण्याबरोबरच गत काही अनुचित घटनांचा विचार करता यंदाही विल्होळीच्या तलावात गणेश विसर्जन न करण्याचा व करू देण्याचा निर्णय ग्रामसभेत घेण्यात आला.येथील हनुमान मंदिर येथे विल्होळी ग्रामपंचायत, ग्रामस्थ व तालुका पोलीस स्टेशनच्या वतीने ग्रामसभा घेण्यात आली. गावाच्या तलावातील पाण्याची साठवण क्षमता ३० दशलक्ष घनफूट इतकी आहे, त्यामुळे तलावातील गणपती विसर्जन केल्यामुळे मोठ्या प्रमाणात प्रदूषण निर्माण होऊ शकते, तसेच तलावातील पाण्याच्या खोलीचा अंदाज येत नसल्यामुळे मागे काही दिवसांपूर्वी याच ठिकाणी दोन ते तीन भाविकांना आपला जीव गमवावा लागला आहे. सदर तलावातील गाळ, मुरूम काढण्यात आलेल्या असून, तलावामध्ये ओबडधोबड स्वरूपाचे मोठे खड्डे पडले आहेत. त्यामुळे तलावातील पाण्यामुळे या खड्ड्यांचा व खोलीचा अंदाज येत नाही. तसेच विसर्जन काळात मोठे अपघात होण्याची शक्यता असल्याने विल्होळी तलावात विसर्जन बंदी कायम ठेवण्यावर ग्रामस्थांचे एकमत झाले. यावेळी तालुका पोलीस ठाण्याचे निरीक्षक अनंत मोहिते यांनी गावकºयांना मार्गदर्शन केले. महामार्गावर असलेले विल्होळी गाव संवेदनशील असल्याचे समजले होते. परंतु गावातील एकोपा पाहिल्यावर कायदा व सुव्यवस्था राखणारे गाव असल्याचे जाणवले. गावात एकोपा नांदून गुन्हे कमी कसे होतील यासाठी आपले प्रयत्न राहणार असल्याचे सांगितले. तालुका पोलीस ठाण्यापासून विल्होळी गाव दूर असले तरी, ग्रामस्थांनी अडचणीच्या काळात भ्रमणध्वनीवर संपर्क साधावा त्यांना प्रतिसाद दिला जाईल, असे आश्वासनही त्यांनी दिले. यावेळी विल्होळी सरपंच बाजीराव गायकवाड, उपसरपंच श्री कृष्ण मते, सदस्य सोमनाथ भावनाथ, माजी पंचायत समिती उपसभापती सुजाता रूपवते, सहायक पोलीस उपनिरीक्षक सुभाष देवरे, पोलीसपाटील संजय चव्हाण, मनोहर भावनाथ, मोतीराम भावनाथ उपस्थित होते.

 

टॅग्स :ganpatiगणपतीNashikनाशिक