लोकमत न्यूज नेटवर्कदेवगाव : चार महिने उलटले तरी कोरोनाचे संकट दूर होत नसल्यामुळे सर्वचजण हवालदिल झाले आहेत. वाजंत्री, मंडप डेकोरेटर्स, सजावटकार आणि दुकानदार यांच्यावर मोठे आर्थिक संकट कोसळले आहे. लग्नाचा हंगाम, विविध सण-उत्सवांचा हंगाम हातचा गेल्यानंतर आता गणेशोत्सवावरही कोरोनाचे संकट कायम असल्यामुळे या व्यावसायिकांवर उपासमारीची वेळ आली आहे, तर या व्यवसायावर अवलंबून असणाऱ्या कामगारांवर उपासमारीची वेळ ओढवली आहे.गणेशोत्सव साजरा करताना सरकारी अटी व नियमांचे काटेकोर पालन करावे लागत असल्यामुळे या व्यावसायिकांच्या आशेवर पाणी फेरले गेले आहे.कोरोनाच्या जागतिक संकटामुळे भारतीय सण-उत्सवांवर गदा आली आहे. सुरक्षेचे नियम पाळून आणि साध्या पद्धतीने अनेक सण घरातच साजरे करण्यात आले. महाराष्ट्रातील मोठा सण असलेल्या गणेशोत्सवालाही याची झळ बसली आहे. त्यामुळे अनेक छोटे-मोठे व्यावसायिक आर्थिक संकटात सापडले आहेत. राज्य शासनाच्या प्रधान सचिवांनी गणेशोत्सवकाळात सरकारी नियमांचे व आदेशांचे पालन करूनच गणेशोत्सव साजरा करण्याचे आदेश राज्यभरातील यंत्रणांना दिले आहेत. सार्वजनिक आणि घरगुती गणेशोत्सवासाठी नियमांची लक्ष्मणरेषा आखून दिली आहे. त्र्यंबकेश्वर तालुक्यातील देवगाव परिसरामध्ये अनेक सार्वजनिक मंडळे व भाविकांनी गणेशोत्सव अगदीच साधेपणाने साजरे करण्याचे एकमताने ठरवले आहे.जीव धोक्यात घालून आपत्ती व्यवस्थापनाचे कामयावर्षी गणेशोत्सवातून मिळणाºया आर्थिक उत्पन्नाला तालुक्यातील मंडप डेकोरेटर्स, सजावटकार, दुकानदार, मखरविक्रेते, मूर्तिकार यांना मुकावे लागणार आहे. गणेशोत्सवात हाताला काम नसल्याने या सर्वांवर उपासमारीचे संकट ओढावले आहे. कोरोनाविरोधात लढण्यासाठी ग्रामप्रशासन, पोलीस प्रशासन, आरोग्य विभाग, आपत्ती व्यवस्थापन आणि शासनातील अन्य कमर्चारी जीव धोक्यात घालून लढत आहेत. महाराष्टÑ शासनाने गणेशोत्सव काळासाठी काही मर्यादा घालून दिल्या आहेत. यावर्षी घरगुती बाप्पाची मूर्ती दोन फूट, तर सार्वजनिक गणेशमूर्तीची उंची चार फूट असेल तसेच गणरायाच्या विसर्जनासाठी जलप्रदूषण होणार नाही याची काळजी सार्वजनिक मंडळांनी घ्यायला हवी. विसर्जनानंतर तलाव परिसरात स्वच्छतेची काळजीदेखील मंडळांनी घ्यायला हवी, अशा सूचना आहेत.चार महिन्यांपासून कुठल्याही प्रकारच्या उत्सवाच्या आॅडरर्््स नसल्यामुळे मोठ्या प्रमाणात आर्थिक फटका बसला आहे. लग्न सराई सारखा गणपती आणि नवरात्रीचा हंगाम वाया जाऊ नये एवढीच अपेक्षा. आमच्या व्यवसायावर अवलंबून असणाºया कामगारांना उपासमारीचा सामना करावा लागत आहे.- संजय पालवे,मंडप डेकोरेटर्स, खोडाळा
कोरोनाच्या विघ्नामुळे डेकोरेटर्स अडचणीत
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: August 24, 2020 10:58 PM
देवगाव : चार महिने उलटले तरी कोरोनाचे संकट दूर होत नसल्यामुळे सर्वचजण हवालदिल झाले आहेत. वाजंत्री, मंडप डेकोरेटर्स, सजावटकार आणि दुकानदार यांच्यावर मोठे आर्थिक संकट कोसळले आहे. लग्नाचा हंगाम, विविध सण-उत्सवांचा हंगाम हातचा गेल्यानंतर आता गणेशोत्सवावरही कोरोनाचे संकट कायम असल्यामुळे या व्यावसायिकांवर उपासमारीची वेळ आली आहे, तर या व्यवसायावर अवलंबून असणाऱ्या कामगारांवर उपासमारीची वेळ ओढवली आहे.
ठळक मुद्देफटका : अनेक छोटे-मोठे व्यावसायिक डबघाईस; अनेक मजुरांवर उपासमारीची वेळ