शहरं
Join us  
Trending Stories
1
‘धर्मयुद्ध’, ‘व्होट जिहाद’वर स्वामी गोविंददेव गिरी स्पष्टच बोलले; म्हणाले, “हिंदू समाजाने...”
2
राज ठाकरेंशी चांगले संबंध होते, अचानक मिठाचा खडा पडून काय बिनसले? CM शिंदेंनी सगळेच सांगितले
3
“महाराष्ट्रद्रोही जिंकणार की महाराष्ट्रप्रेमी जनता हे ठरवणारी निवडणूक आहे”: उद्धव ठाकरे
4
मणिपूरमध्ये सत्ताधारी भाजपला धक्का; NPP ने पाठिंबा काढून घेतला, सरकार कोसळणार?
5
प्रियंका गांधींचे पंतप्रधान मोदींना खुले आव्हान; म्हणाल्या, “एकदा जाहीर करून दाखवा की...”
6
रेवंथ रेड्डींचे अजब आवाहन; म्हणाले, “त्यांच्याकडून भरपूर पैसे घ्या, पण मत काँग्रेसला द्या”
7
माझ्या वडिलांचा फोटो लावणं सोडा, हिंमत असेल तर...; उद्धव ठाकरेंचा पुन्हा घणाघात
8
ठाकरे सेनेच्या मुस्लिम उमेदवाराची मंदिरात पूजा, शिवलिंगाचा अभिषेक अन् आरती केली...
9
नागपूरमध्ये प्रियंका गांधींचा रोड शो; भाजप कार्यकर्त्यांनी दाखवले कमळ, परिसरात प्रचंड तणाव
10
विदर्भात ५४ टक्के जागांवर कुणबी, मराठा उमेदवार; भाजपानं काँग्रेसची केली कोंडी
11
Maharashtra Vidhan Sabha Election 2024 : उद्धव ठाकरे यांच्यासोबत पुन्हा जाणार का?; एकनाथ शिंदेंनी एका वाक्यात सांगितलं
12
सुपर-डुबर HOT!! भारतीय क्रिकेटपटूच्या बहिणीचा बोल्डनेस, घायाळ करणारा लूक Viral (Photos)
13
माहिमच्या सर्व समाजासह मला मुस्लिमांचाही पाठिंबा; महेश सावंतांना विजयाचा विश्वास 
14
दुगलाईच्या जंगलात पोलिस आणि नक्षलवाद्यांमध्ये चकमक, एक जवान जखमी
15
'मी मुख्यमंत्रीपदाच्या शर्यतीत नाही, पण...', सीएम एकनाथ शिंदेंचं मोठं वक्तव्य
16
पाकिस्तानी लष्कराच्या चेक पोस्टवर दहशतवादी हल्ला, सात सुरक्षा जवान शहीद; १८ जखमी
17
“माझा नाद करायचा नाही, जोरात पाडायचे, संपूर्ण महाराष्ट्रात संदेश गेला पाहिजे”: शरद पवार
18
सतत निष्ठा बदलणारा हा व्यक्ती...; अजित पवारांनी अमोल कोल्हेंचा इतिहासच काढला
19
PM मोदींचे आव्हान राहुल गांधींनी स्वीकारले; बाळासाहेब ठाकरेंबाबत बोलले, पोस्ट करत म्हणाले...
20
हृदयद्रावक! साता जन्माची साथ अवघ्या ७ महिन्यांत सुटली; आक्रित घडलं अन् सारचं संपलं

 उत्तर महाराष्ट्रात कोरोना बाधीतांच्या मृत्यू दरात घट

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: October 04, 2020 11:40 PM

नाशिक- उत्तर महाराष्ट्रातील पाच जिल्'ात गत आठवड्याच्या तुलनेत यंदा रूग्णांची संख्या वाढली असली तरी एकुण रूग्ण बरे होण्याच्या प्रमाणात आणि मृत्यू ...

ठळक मुद्दे१.९ टक्के:  बरे होण्याच्या प्रमाणात तीन टक्क्यांनी वाढ

नाशिक- उत्तर महाराष्ट्रातील पाच जिल्'ात गत आठवड्याच्या तुलनेत यंदा रूग्णांची संख्या वाढली असली तरी एकुण रूग्ण बरे होण्याच्या प्रमाणात आणि मृत्यू दरात घट झाली आहे. गेल्या आठवड्यात बरे होण्याचे प्रमाण ८५.९४ टक्के होते. ते आता ८८.१ टक्के इतके झाले आहेत. तर गेल्या आठवड्यात मृत्यू दर २.०२ टक्के इतका होता. तो आता १.९९ टक्के इतका झाला आहे.उत्तर महाराष्ट्रातील नाशिक , अहमदनगर, धुळे, जळगाव, नंदुरबार या पाच जिल्'ात गेल्या आठवड्यात १ लाख ७७ हजार ३५१ रूग्ण होते. यात आठवडभरात वाढ झाली आहे. रविवारपर्यंत ही संख्या एक लाख ९३ हजार पर्यंत पोहोचली आहे. त्यातील १ लाख ६९ हजार १५३ रुग्ण उपचार केल्याने बरे झाले आहेत.कोरोना रुग्ण बरे होण्याचे हे प्रमाण ८८.०१ टक्के इतके आहे. तर करोनामुळे आतापर्यंत विभागात ३८१७ जणांचा मृत्यू झाला असून मृत्यूदर १.९९ टक्के आहे. उत्तर महाराष्ट्राच्या पाच जिल्'ात गेल्या २४ तासात विभागात १९५० नवीन कोरोना रुग्ण आढळले. तर उपचाराअंती १८३८ रुग्ण बरे होऊन घरी गेले. तर चोविस तासातच ५३ करोनाबाधितांचा मृत्यू झाला.आतापर्यंत उत्तर महाराष्ट्रात पाच लाख ७७ हजार ५३८ रुग्णांची चाचणी करण्यात आली. त्यातील ३३.२७ टक्के रूग्ण पॉझीटीव्ह आले तर तीन लाख ८१ हजार ७१३ जणांचे अहवाल निगेटीव्ह आले. अजुनही दोन हजार नमुन्यांचे अहवाल सध्या प्रलंबित आहेत. सध्या विभागात १९ हजार २१९ रुग्ण उपचार घेत आहेत.उत्तर महाराष्ट्रात कोरोनाचे सर्वाधिक म्हणजे ७९ हजार २८० रुग्ण नाशिक जिल्'ाात आढळले आहेत. मात्र, यातील ६८ हजार ४०९ रुग्ण उपचाराअंती करोनामुक्त झाले. तर १४२७ रुग्णांचा मृत्यू झाला. सध्या नऊ हजार ४४४ रुग्ण नाशिक जिल्'ात उपचार घेत आहेत. जळगाव जिल्'ाात कोरोना बाधीतांची संख्या ५० हजाराच्या टप्पात आहे. त्यापैकी ४३ हजार १४८ रुग्ण बरे झाले. तर ११९८ जणांचा मृत्यू झाला. या जिल्'ात सध्या चार हजार ७६० रुग्ण उपचार घेत आहेत.अहमदनगर जिल्'ाात कोरोनाचा प्रसार वाढत असून आतापर्यंत ४५ हजार ६१७ रुग्ण आढळले. त्यातील ४१ हजार ३६९ रुग्ण बरे झाले. तर ७०३ रुग्णांचा मृत्यू झाला. सध्या ३५४५ रुग्ण उपचार घेत आहेत. धुळे जिल्'ाात करोनाबाधितांची संख्या १२ हजार पाचशेवर गेली आहे.त्यातील ११ हजार ४७६ रुग्ण बरे झाले आहेत तर ३६५ रूग्णांचा मृत्यू झाला. सध्या धुळे येथे ६६९ रुग्ण उपचार घेत आहेत. नंदुरबार जिल्'ात आतापर्यंत ५ हजार ६७६ रुग्ण आढळले. त्यातील ४ हजार ७५१ रुग्ण बरे झाले तर १२४ जणांचा मृत्यू झाला. सध्या ८०१ रुग्णांवर उपचार सुरू आहेत.घरीच उपचारांना प्राधान्यगेल्या काही दिवसात कोरोनाबाधीतांच्या उपचारासाठी शासकिय रूग्णालये आणि खासगी रूग्णालयांची संख्या वाढत असली तरी घरी राहून उपचार घेणा-यांची संख्या वाढु लागली आहे. उत्तर महाराष्ट्रात सध्या २५ हजार ७०३ रूग्ण हे गृहविलगीकरणात राहून उपचार घेत आहेत. 

 

टॅग्स :corona virusकोरोना वायरस बातम्याhospitalहॉस्पिटल