लोकमत न्यूज नेटवर्कवणी : द्राक्ष खरेदी विक्रीच्या व्यवहार प्रणालीत विविध कारणांमुळे अपेक्षित गती येत नसल्याने उत्पादकांमध्ये चलबिचल वातावरण असून, सद्यस्थितीत सांगली जिल्ह्यातील द्राक्षांना परराज्यात मागणी वाढल्याने याचाही प्रतिकूल परिणाम स्थानिक पातळीवरील व्यवहार प्रणालीवर होतो आहे.थॉमसन, सोनाका व काळी अशा तीन प्रकारच्या द्राक्षाचे उत्पादन दिंडोरी तालुक्यात घेण्यात येतात. त्यात अनुषंगिक तत्सम विविध प्रकारच्या जातींचा समावेश त्यात आहे. स्थानिक पातळीवर परराज्य तसेच परदेशात नमूद द्राक्षांना विक्री करण्यासाठीविविध कसोट्या पार पाडाव्या लागतात. दरम्यान, गत काही कालावधीत प्रचंड थंडी परराज्यात प्रतिकूल वातावरणामुळे मागणी नाही.परदेशात निर्यातीसाठी काही भागातील सीमाबंदी याचा फटका तालुक्यातील द्राक्ष उत्पादकांना बसला.सद्यस्थितीत थॉमसन जातीच्या द्राक्षांना कमी दर मिळतो आहे. प्रतवारी व दर्जा पाहून दरात वाढ होण्याची अपेक्षा ठेवली जात असताना सोनाका व काळीकिंवा पर्पल जातीची द्राक्षे तुलनात्मकरीत्या कमी आहेत. त्याच्या खर्चाच्या तुलनेत अपेक्षित दर नाही.स्थानिक पातळीवर व परराज्यात पाठविण्यात येत असलेल्या प्रतिकिलो द्राक्षाला सोळा रुपये उत्पादन खर्चतर निर्यातक्षम द्राक्षांना ३० रुपये प्रतिकिलोचा उत्पादन खर्चयेत असल्याची माहितीनिर्यातक्षम द्राक्ष उत्पादक प्रकाश कड यांनी दिली. त्यातसर्वच इत्थंभूत खर्चाचा समावेश आहे.त्या तुलनेत सध्या दर नाही. काही द्राक्ष उत्पादकांनी बेदाण्यासाठी किमान दरात द्राक्ष विक्री करण्याचा निर्णय नाईलाजाने घेतला आहे. त्यात द्राक्षात साखरेची पातळी समाधानकारक असेल तरच उत्कृष्ट बेदाणा तयार होतो. तेव्हा यापरीक्षेतूनही उत्पादकांना जावे लागते आहे.सांगली जिल्ह्यातील द्राक्षांना मागणीकाही द्राक्ष उत्पादकांचे क्षेत्र पाच महिन्याचा कालावधी उलटूनही हिरवीगारद्राक्षे दिसतात. त्यात ओव्हरलोडच्या द्राक्षबागांमुळेही उत्पादनावर व दर्जावर प्रतिकूल परिणाम होत असल्याची माहिती कड यानी दिली. सध्या सांगली जिल्ह्यातील प्रामुख्याने तासगाव भागातील सोनाका जातीची द्राक्षे दिल्ली, गुजरात, उत्तर प्रदेश या ठिकाणी मोठ्या प्रमाणावर दररोज विक्र ीसाठी जात आहेत. साधी सोनाका, सुपर सोनाका, आर के सोनाका अशा जातीच्या द्राक्षांचा दर प्रतवारी व दर्जानुसार असून, या द्राक्षांचे आकारमान, लांबी, गोडवा, रंग या बाबी तुलनात्मक उजव्या असल्याने या द्राक्षांनी परराज्यात आव्हान उभे केलेले आहे. संघर्ष सुरुच दिंडोरी तालुक्यातील काही परप्रांतीय व्यापाऱ्यांनीही सांगलीचा रस्ता द्राक्ष खरेदीसाठी धरला आहे. त्या ठिकाणी व्यवहारप्रणालीत गती आली आहे. तालुक्यातील काही वाहनेही सांगलीहून गुजरात, दिल्ली, उत्तर प्रदेश अशा ठिकाणी द्राक्षे विक्र ीसाठी दररोज घेऊन जात असल्याची माहिती वाहनमालक अमोल लहितकर यांनी दिली. ही सर्व आव्हाने पेलणाºया उत्पादकांना तालुक्याच्या पातळीवर संघर्ष करावा लागत आहे. व्यापारी मर्यादित व उत्पादक अमर्यादित हे गणित जुळणे अवघड आहे. त्यामुळे व्यापाऱ्यांच्या मागे उत्पादकांना द्राक्ष विक्र ीसाठी फिरु न मिन्नतवाºया कराव्या लागत आहे.
जिल्ह्यात द्राक्षांच्या मागणीत घट
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: February 28, 2020 12:11 AM
वणी : द्राक्ष खरेदी विक्रीच्या व्यवहार प्रणालीत विविध कारणांमुळे अपेक्षित गती येत नसल्याने उत्पादकांमध्ये चलबिचल वातावरण असून, सद्यस्थितीत सांगली जिल्ह्यातील द्राक्षांना परराज्यात मागणी वाढल्याने याचाही प्रतिकूल परिणाम स्थानिक पातळीवरील व्यवहार प्रणालीवर होतो आहे.
ठळक मुद्देउत्पादकांमध्ये चलबिचल : स्थानिक पातळीवरील व्यवहाराची गती मंदावली