पंचवटी : संपूर्ण देशात हाहाकार माजविणाऱ्या कोरोनाचा सर्वच अर्थव्यवस्था तसेच उद्योग धंद्यांवर मोठ्या प्रमाणात परिणाम जाणवला आहे. नाशिक कृषी उत्पन्न बाजारसमितीच्या आर्थिक उत्पन्नात देखिल मोठ्या प्रमाणात घट झाली असून एप्रिल ते आॅगस्ट महिन्यात तब्बल सव्वा दोन कोटी रुपयांचे उत्पन्न घटल्याने बाजारसमितीला मोठा आर्थिक फटका बसला आहे.मार्च महिन्यात कोरोना विषाणूंचा संसर्ग वाढल्याने बाजारसमितीत येणाºया शेतमालाची आवक मोठ्या प्रमाणात घटली होती त्यातच राज्यातील अनेक कृषी उत्पन्न बाजार समित्या बंद असल्याने परजिल्ह्णात तसेच बाजारसमिती व मुंबई, मुंबई उपनगर, परराज्यात शेतकऱ्यांना आणलेला शेतमाल पाठविता आला नाही त्यातच शासनाने धान्य, तेलबिया, कडधान्ये व अन्य शेतमाल नियमन मुक्ती केल्याने बाजारसमितीला बाजार शुल्क तसेच गाळे भाडे व अन्य माध्यमातून मिळणारे उत्पन्न कमी भेटले त्याचा परिणाम बाजारसमितीच्या आर्थिक उत्पन्नावर जाणवला.बाजार समितीला दर महिन्याकाठी साधारणपणे अंदाजे सव्वा ते दिड कोटी रुपये उत्पन्न मिळत असते मात्र गेल्या पाच महिन्याच्या कालावधीत बाजारसमितीला दर महिना अंदाजे कधी 63 लाख तर कधी 66 लाख रुपये असे उत्पन्न मिळाल्याने जवळपास 50 टक्क्यांनी उत्पन्न घटले आहे.
पाच महिन्यात सव्वादोन कोटी रुपयांच्या उत्पन्नात घट
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: August 25, 2020 11:43 PM
पंचवटी : संपूर्ण देशात हाहाकार माजविणाऱ्या कोरोनाचा सर्वच अर्थव्यवस्था तसेच उद्योग धंद्यांवर मोठ्या प्रमाणात परिणाम जाणवला आहे. नाशिक कृषी उत्पन्न बाजारसमितीच्या आर्थिक उत्पन्नात देखिल मोठ्या प्रमाणात घट झाली असून एप्रिल ते आॅगस्ट महिन्यात तब्बल सव्वा दोन कोटी रुपयांचे उत्पन्न घटल्याने बाजारसमितीला मोठा आर्थिक फटका बसला आहे.
ठळक मुद्देबाजार समिती : कोरोना व नियमन मुक्तीचा परिणाम