वणी : येथील उपबाजारात बुधवारी १४००० क्विंटल कांद्याची आवक झाली तर गुरुवारी ४०० क्विंटल आवक झाली. बुधवारी ५८८ वाहनांमधून १४ हजार क्विंटल कांदा उत्पादकांनी विक्रीसाठी आणला होता.कांदा वाहतूक करणाऱ्या ट्र्ॅक्टरच्या रांगा वणी-सापुतारा रस्त्यावर लागल्याने वाहतुकीवर ताण पडला होता व उशिरापर्यंत लिलाव सुरू होते. कमाल १४३० किमान ९०० तर सरासरी १२०० रुपये क्विंटल असा दर उत्पादकांना मिळाला. लहान आकारमानाच्या कांद्याला कमाल ११९० किमान ५०० तर सरासरी ८२५ असे दर मिळाले. गुरुवारी २४ वाहनांमधून ४०० क्विंटल इतकी कांदा आवक झाली. १३९१ कमाल १००० किमान तर १२३० सरासरी अशा दराने व्यापाऱ्यांनी कांदा खरेदी केला तर लहान आकारमानाच्या कांद्याला कमाल ९०० किमान ५०० तर सरासरी ८५० रुपये क्विंटलचा दर मिळाला. गुरुवारी उपबाजारातील आवक कमी राहिल्याने आर्थिक उलाढालीवर मर्यादा आल्या होत्या.
वणीत कांदा आवकेत घट
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: March 19, 2020 9:50 PM