वणी : येथील उपबाजार आवारात बुधवारच्या तुलनेत आज ५०० क्विंटलने कांदा आवकेत घट झाली. बुधवारी तीन हजार क्विंटल आवकेच्या तुलनेत गुरूवारी २५०० क्विंटल कांद्याची आवक उपबाजारात झाली. २१२७ रु पये कमाल १५०० रु पये किमान तर १८८० रु पये सरासरी असा दर प्रती क्विंटलला मिळाला. आवकेत होत असलेल्या घटीमुळे खरेदी विक्र ी व्यवहार प्रणालीत अस्थिरता आली आहे. बुधवारी येथील उपबाजारात तीन हजार क्विंटल कांद्याची आवक झाली. कमाल २०१२, किमान १५०० तर १८२५ रु पये सरासरी प्रती क्विंटल दराने व्यपाऱ्यांनी कांदा खरेदी केला. लहान आकारमानाच्या कांद्याचा दर असा १६०१, कमाल ५०० किमान तर १३०० रु पये प्रति क्विंटल सरासरी अशा दराने उत्पादकांनी कांदा विक्र ी केला. होळीपासुन रंगपंचमीपर्यंत उत्सवाचा कालावधी असल्याने कांदा आवकेवर परिणाम झाला आहे. बहुतांशी उत्पादक व मजुर उत्सव साजरा करण्यात व्यस्त असल्याने रंगपंचमीनंतर आवकेत वाढ होण्याचा अंदाज वर्तविण्यात येत आहे.
वणीत कांदा आवकेत घट
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: March 12, 2020 1:04 PM