शहरं
Join us  
Trending Stories
1
Ajit Pawar On Sharad Pawar : "मी जी राजकीय भूमिका घेतली ती साहेबांना सांगूनच, आधी हो म्हणाले नंतर..."; अजित पवारांचा गौप्यस्फोट
2
Breaking: खळबळजनक! दहशतवाद्यांकडून दोन जवानांचे अपहरण; पैकी एक तावडीतून सुटला
3
साईबाबा संस्थानला गुप्त दानावर कर द्यावा लागणार? हायकोर्टाने महत्वाचा निर्णय घेतला
4
राम रहीमला ६ वेळा पॅरोल देणाऱ्या माजी पोलीस अधिकाऱ्याचा विजय; भाजपमध्ये केला होता प्रवेश
5
"जिंकलेल्या डावाचे पराभवात रूपांतर करायचे काँग्रेसकडून शिकावे"; हरयाणा निकालावरुन ठाकरे गटाचा निशाणा
6
हरयाणात BJP, जम्मू-काश्मिरात इंडिया; महाराष्ट्रात काय होणार? महायुती-मविआत कोणाचा दबाव वाढेल?
7
आजचे राशीभविष्य ९ ऑक्टोबर २०२४; प्रतिस्पर्ध्यांवर विजय मिळवाल
8
हरयाणात घडले तेच महाराष्ट्रातही घडणार; भाजपच्या जल्लोष सभेत देवेंद्र फडणवीस यांचा विश्वास
9
अखेर ठरले... अजित पवार बारामतीतूनच लढणार; प्रफुल्ल पटेल यांनी जाहीर केली उमेदवारी
10
जम्मू-काश्मीरमध्ये 'इंडिया', ओमर अब्दुल्ला होणार मुख्यमंत्री; आपनेही खाते उघडले
11
हरयाणात भाजपची हॅट्ट्रिक; काँग्रेसच्या पाच जागा वाढल्या, पण बहुमताची हुलकावणी
12
मुख्यमंत्रिपदाचा उमेदवार जाहीर करा; उद्धव ठाकरे यांचे काँग्रेस, शरद पवार गटाला आवाहन
13
एक्झिट पोल पडले तोंडावर; भाजपच्या जागांबाबत बहुतांश अंदाज फसले, निकालांबाबत होती उत्सुकता
14
ओमर हेच मुख्यमंत्री, वाटेकरी कुणीच नाही; फारूख अब्दुल्लांनी केले जाहीर, काँग्रेसचे ६ विजयी
15
घोळ सरेना, नाव ठरेना, अध्यक्ष मिळेना! शर्यतीत अनेक दिग्गज; पण, शिक्कामोर्तब कधी?
16
०.८५ टक्के कमी मते अन् गमावल्या ११ जागा; भाजप-काँग्रेसच्या मतांची टक्केवारी जवळपास सारखीच
17
जम्मू-काश्मीर विधानसभा निकालात ‘इंडिया’ने मारली बाजी, तरी भाजप ठरला बाजीगर
18
हरयाणामध्ये भाजप जिंकण्यामागचे गणित काय? काँग्रेसच्या हातात असलेला विजय हिसकावला
19
मागासवर्गीय मतदारांनी काँग्रेसकडे फिरविली पाठ; हरयाणात जाट-बिगर जाट मतांचे ध्रुवीकरण
20
काँग्रेसच्या मनोबलावर परिणाम होणार नाही; हरयाणा निकालावर रमेश चेन्नीथलांचे मत

तिथी कमी असल्याने  वाढता खर्च ठरतोय डोकेदुखी

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: April 28, 2018 12:13 AM

प्रत्येकाच्या जीवनातील अविभाज्य घटक म्हणजे लग्न समारंभ. या सोहळ्याला मित्र परिवार, आप्तेष्ट, नातेवाईक यांनी येऊन भेट द्यावी, अशी प्रत्येक वधू-वरांची आणि आई-वडील यांची इच्छा असते मात्र दिवसभरात किमान दहा ते पंधरा लग्न असल्याने सर्व लग्न-कार्याला भेट देताना हैराण झाले आहेत.

सायखेडा : प्रत्येकाच्या जीवनातील अविभाज्य घटक म्हणजे लग्न समारंभ. या सोहळ्याला मित्र परिवार, आप्तेष्ट, नातेवाईक यांनी येऊन भेट द्यावी, अशी प्रत्येक वधू-वरांची आणि आई-वडील यांची इच्छा असते मात्र दिवसभरात किमान दहा ते पंधरा लग्न असल्याने सर्व लग्न-कार्याला भेट देताना हैराण झाले आहेत.  मार्च महिन्यात लग्न तिथी होत्या. मात्र १९ एप्रिलपर्यंत लग्नाच्या तारखा नसल्याने लग्न सोहळे बंद होते. आता १२ मेपर्यंतच लग्नतिथी असल्याने व नंतर अधिक मास लागणार असल्याने लग्न बंद होतील. २० दिवसाचा मोजका कालावधी असल्याने लगीनघाई सुरू असून, एकाच दिवशी अनेक लग्न आल्यामुळे लग्न ज्या कुटुंबात आहे त्यांच्यावर दुसऱ्या लग्नात नाही गेले तर कोणी रु सत नाही मात्र सामान्य माणूस गेला नाही तर त्यांच्यावर रु सवा फुगवा येतो म्हणून लग्नाला किमान भेट द्यावी लागत असल्याने एकाच दिवशी पंधरा लग्न तेदेखील किमान तीन तासात भेट देताना कसरत करावी लागत आहे.लग्नतिथीचा कमी कालावधी असल्याने लॉन्स, फोटोग्राफर, केटर्स, मिरवणुकीसाठीचा डीजे, घोडा असे लग्नसराईत महत्त्वाचे तेजीत असणाया व्यावसायिकांचा तोटा आहे. तारखा कमी असल्याने कमी दिवस व्यवसाय चालणार आहे शिवाय एकाच दिवशी एकच आॅर्डर करता येत असल्याने अगदी वीस ते पंचवीस दिवस व्यवसाय तेजीत रहाणार आहे. दोन ते अडीच महिन्याचा मोठा कालावधी व्यवसाय सुरू राहिला असता कमी तारखांचा मोठा फटका बसणार आहे. लग्न तारीख धरली असली तरी वधू-वरांकडील माणसांना लग्नाशी संलग्न असलेल्या व्यावसायिकांना आधीच तारखा बुक असल्याने लॉन्स, फोटोग्राफर, डीजे, असे व्यावसायिक मिळत नसल्याने मोठी कसरत करावी लागत आहे. शिवाय जर एखादा मिळालाच तर तो ऐनवेळी अडवणूक करून जास्त पैसे आकारत आहे त्यामुळे खर्चाचा अंदाज वाढत असून, वाढत्या खर्चाने वधू-वरांकडील दोन्ही मंडळी हैराण होत आहे.

टॅग्स :Nashikनाशिक